19.4 C
New York
Thursday, May 9, 2024

Buy now

कालिका गणेश मंडळ आयोजित रक्तदान शिबिर संपन्न..

कालिका गणेश मंडळ आयोजित रक्तदान शिबिर संपन्न..

बीड प्रतिनिधी – बीड तालुक्यातील नेकनुर येथील कालिका गणेश मंडळाने प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. घेण्यात आलेले रक्तदान शिबिर हे महादेव मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या शिबिराचे आयोजन कालिका गणेश मित्र मंडळाने केले होते. रक्तदान शिबिराचे उद्घाटन मा. श्री. शिवाजी दादा शिंदे, श्याम तात्या शिंदे आणि अध्यक्ष श्रीकांत मुळे यांनी केले आहे. कालिका गणेश मंडळ गणेशोत्सवानिमित्त वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत असते यावर्षी सुद्धा त्यांनी समाज उपयोगी उपक्रम राबवत गणेश उत्सव साजरा केला आहे. आपला परिवार वृद्धाश्रमामध्ये किराणा वाटप तसेच रक्तदान शिबिर असे वेगवेगळे उपक्रम कालिका गणेश मंडळ राबवत असते. रक्तदान करू या.., एखाद्याला नवीन आयुष्य देऊ या..’ रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे.त्यामुळे रक्तदात्याने केलेले रक्तदान हे गरजवंतासाठी अमृत असते. आजच्या आधुनिक युगात रक्तदान करणे हे सर्वश्रेष्ठ रक्तदान मानले जाते. हेच पाहून कालिका गणेश मंडळाने रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या रक्तदान शिबिरामध्ये भरगच्च असा प्रतिसाद मिळाला. इथून पुढे सुद्धा कालिका गणेश मंडळ असेच सामाजिक उपक्रम राबवणार असल्याचे माऊली न्युज शी बोलताना मार्गदर्शक महादेव मुळे, अध्यक्ष श्रीकांत मुळे यांनी सांगितले. यावेळी उपस्थित गणेश मंडळाचे उपाध्यक्ष राहुल सुर्वे, कोषाध्यक्ष संदीप मुळे, सचिव सुनील गायकवाड, सहसचिव दीपक मुळे, कार्याध्यक्ष किशोर चव्हाण, आणि कालिका गणेश मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!