22.5 C
New York
Sunday, May 19, 2024

Buy now

लोकनेते स्व.विनायकराव मेटे यांच्या नंतर महाराष्ट्रसहित परराज्यातही मेटे परिवाराचा मदतीचा हात

  • लोकनेते स्व.विनायकराव मेटे यांच्या नंतर महाराष्ट्रसहित परराज्यातही मेटे परिवाराचा मदतीचा हात
  • महाराष्ट्रातच नव्हे परराज्यातही गोर – गरिबांना मेटे परिवाराची मदत 
  • आयर्न लेडी डॉ. ज्योती मेटे यांची बीडच्या ट्रक ड्रायव्हरला परराज्यातही मदत.. 
  • बीड (प्रतिनिधी):- पोलिसांनी गाडी पकडल्यानंतर ट्रक चालक गाडी सोडून देण्यासाठी विनवणी करतानाचे अनेक प्रसंग आपण पाहिले परंतु त्या ट्रक चालकाची गाडी घेऊन जा असे सांगण्यासाठी आख्ख पोलीस स्टेशन जेव्हा कामाला लागते. असं क्वचितच घडते. ही काही चित्रपटाची कथा नाही. मागील आठवड्यात घडलेला एक सत्यप्रसंग आहे. लोकनेते स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेबांनी शिवसंग्रामच्या माध्यमातून आयुष्यभर वंचित उपेक्षितांना न्याय मिळावा यासाठी संघर्ष केला व आपली राजकीय ताकद वापरून गोरगरिबांचे प्रश्न सोडवले . त्यांच्या पश्चात डॉ. ज्योती मेटे यांनी शिवसंग्रामला वाऱ्यावर सोडणार नाही यापुढेही वंचित उपेक्षितांना न्याय मिळेल आणि साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसंग्राम सातत्याने प्रयत्न करेल अशी ग्वाही दिली होती .
  • घटना अशी की जीवाचीवाडी ता. केज जि. बीड येथील पप्पू सुदाम चाटे ट्रक चालक व त्यांचे मित्र भरत काकडे रा. सबला ता. केज जि. बीड हे लाईनवर गाडी चालवतात ते गुवाहाटी,आसाम राज्यातून अंगुला,ओरिसा येथे जात असताना झारखंड मध्ये त्यांची ट्रक पोलिसांनी पकडली यांचे कागदपत्र बरोबर असतानाही त्यांना ७० हजार रुपयांचा फाईन ठोठावला गेला . सर्व कागदपत्रे असतानाही काही त्रुटी असल्यास थोडाफार दंड भरावाच लागतो हे आपण समजू शकतो . परंतु सरळ ७० हजार रुपयांचा फाईन झाल्यानंतर मात्र या चालकांनी डोक्यालाच हात लावला. पैसे भरा आणि गाडी घेऊन जा असं त्यांना पोलीस स्टेशन मधून सांगण्यात आलं तेव्हा मात्र त्यांच्यासमोर कुठलाच पर्याय राहिला नाही . त्यांनी राजकीय मदत मिळवण्याची प्रयत्न केला परंतु त्यांचा प्रश्न सुटला नाही .मग त्यांच्या लक्षात आलं की आपण डॉ.ज्योती मेटे यांना एकदा ही गोष्ट कानावर घालावी म्हणून त्यांनी संपर्क केला तेव्हा ताईंनी सत्य परिस्थिती समजून घेतली आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखून फोनाफोनी केली योगायोगाने डॉ. ज्योती मेटे यांचे बंधू आणि स्व. विनायकराव मेटे यांचे मेव्हणे झारखंड राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून संजय लाटकर हे कार्यरत आहेत. त्यांच्याशी संपर्क झाल्या नंतर सर्व सूत्रे त्यांनी आपल्या हाती घेतले त्यानंतर ज्या पोलीस स्टेशनला ट्रक जमा केल्या होत्या त्या पोलीस स्टेशनचे अधिकारी , कर्मचारी यांची ड्रायव्हरला शोधण्यासाठी धाव – धाव झाली. काही क्षणात ड्रायव्हच्या मोबाईलवर फोन गेला “जिथे असताल तिथून लवकर पोलीस स्टेशनमध्ये या आणि तुमची गाडी घेऊन जा ” हा काही चित्रपटातला प्रसंग नसून झारखंड राज्यामध्ये घडलेला बीड येथील ट्रक चलका सोबतचा प्रसंग आहे . ही ताकद आहे सर्वसामान्य गोरगरीब – वंचित उपेक्षितांची ज्यांनी लोकनेते स्व.विनायकरावजी मेटे साहेब यांच्या पाठीमागे उभा केली. तीच ताकद आज सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवत आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी आयर्न लेडी डॉ. ज्योतिताई मेटे यांच्या पाठीशी ताकतीने उभं राहायला पाहिजे असा भाव या वेळी या चालकांनी व्यक्त केला यासंबंधी डॉ.ज्योतीताई मेटे यांचे बंधू आयपीएस अधिकारी संजयजी लाटकर साहेब यांची खूप मदत झाली .

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!