12.8 C
New York
Monday, May 20, 2024

Buy now

छत्रपती शाहू महाराज सार्वजनिक वाचनालय पिंपरखेड येथे, वाचनालयाच्या वर्धापन दिनानिमित्त स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न…

छत्रपती शाहू महाराज सार्वजनिक वाचनालय पिंपरखेड येथे, वाचनालयाच्या वर्धापन दिनानिमित्त स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न…

गितांजली लव्हाळे वडवणी प्रतिनिधी :-

मौजे पिंपरखेड तालुका वडवणी जिल्हा बीड, येथील छत्रपती शाहू महाराज सार्वजनिक वाचनालय हे 1996 पासून समाज उपयोगी काम करत आहे ..या वाचनालयाच्या माध्यमातून असंख्य विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलेले आहे .अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवून या वाचनालयाच्या माध्यमातून गावातील विद्यार्थी,, पालक यांना शैक्षणिक ,,सामाजिक,, धार्मिक सांस्कृतिक अशा कार्यक्रमामधून प्रबोधन करण्यात आलेलं आहे.. प्रत्येक वर्षी शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धा आयोजित करणे,, वेगवेगळे उपक्रम राबवणे,, विद्यार्थ्यांना बक्षीस देणे,, सामाजिक सलोखा निर्माण व्हावा म्हणून विविध प्रकारचे शिबिर राबवणे असे उपक्रम राबवून ग्रामीण भागात खूप मोठी सामाजिक बांधिलकी म्हणून एक परिवर्तनवादी विचार समाजामध्ये पेरण्याचं काम छत्रपती शाहू महाराज सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून केले जात आहे..

या वाचनालयाला 25 वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे ..या वाचनालयाचा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेले होते.. त्यानिमित्ताने वाचक,, विद्यार्थी,, पालक,, यांना सोबत घेऊन विविध गुणदर्शन कार्यक्रम,, स्नेहसंमेलन कार्यक्रम,, व वाचक वर्ग आणि मान्यवर मंडळीचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आलेला होता. या विविध गुण दर्शनामध्ये जवळपास शंभरापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला .आणि अतिशय आनंदमय वातावरणामध्ये आपल्या विविध कला सादर केल्या. जवळपास दोन महिन्यापासून संस्थेच्या कर्मचारी शीलाताई सुखदेव उजगरे,आणि उदय निवृत्ती खरात सर ,यांनी विद्यार्थ्याकडून विविध गुणदर्शन कार्यक्रम राबवून घेतला.. दोन महिन्यापासून त्यांची तयारी करून घेतली , दिनांक 24 , o 9 2023 रोजी रविवारी,, भव्य दिव्य अशा स्नेहसंमेलन समारंभाचे आयोजन करण्यात आलं .विद्यार्थ्यांनी पालकांनी परिसरातील असंख्य समाज बांधवांनी,, सदरील कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्घाटक म्हणून पिंपरखेड गावच्या सरपंच,सौ लता ज्ञानोबा शिंदे, ह्या उपस्थित होत्या ..प्रमुख पाहुणे म्हणून दत्तगुरु बँकेचे संचालक ,गजानन दादा निपटे, ज्ञानोबा शिंदे सर ,आसारामजी ढगे,, हिरामण दादा खळगे,, शाहू काका झाटे,एडवोकेट खंडोजी काळे ,आणि असंख्य महिला उपस्थित होत्या .सदरील कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन ,छत्रपती शाहू महाराज सार्वजनिक वाचनालयाचे,, सचिव प्रकाश तुळशीराम खळगे, सर यांनी केले.. सतत सामाजिक उपक्रम राबवून ग्रामीण भागामध्ये अतिशय दर्जेदार काम करीत असल्यामुळे ,ग्रामीण भागामध्ये अतिशय शैक्षणिक वातावरण तयार झालेलं आहे ..पालक वर्गामध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे,या छत्रपती शाहू महाराज सार्वजनिक वाचनालयाला ग्रामीण भागात खूप महत्त्व आलेलो आहे ..असंख्य विद्यार्थी,, विद्यार्थिनी,, पालक वाचक या वाचनालयाचा पुरेपूर लाभ घेतात. सदरील वाचनालयामध्ये सौ शिलाताई सुखदेव उजगरे ह्या मन लावून दिवसभर काम करतात ..अनेक विद्यार्थ्यांना आलेल्या अडीअडचणी त्या स्वतः सोडवतात ..त्यांच्यासोबत उदय निवृत्ती खरात सर,, हे सुद्धा विद्यार्थ्यांना स्वतः शिकवतात व अभ्यासाची गोडी लावतात .तसेच अंगणवाडी ताई कार्यकर्त्या अग्नी अण्णाभाऊ खडगे ह्या सुद्धा वाचनालयाला चांगल्या प्रकारे मदत करतात.. अशा या वाचनालयाच्या वर्धापन दिनानिमित्त गावकऱ्यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या. या वाचनालयाचा पुरेपूर फायदा समाज बांधवांनी घ्यावा,, अशी कळकळीची विनंती सरपंच ज्ञानोबा शिंदे सर यांनी गावकऱ्यांना केली ..खळगे सर यांनी सर्वांचे आभार मानले.. खूप वेळानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.. वातावरण प्रसन्न आणि आनंदी असल्यामुळे सर्व विद्यार्थी आणि पालक वर्ग अतिशय खुश होते. या वाचनालयाचा सर्वांनी फायदा घ्यावा अशी कळकळीची विनंती सचिव प्रकाश तुळशीराम खळगे सर यांनी केली. यानिमित्त गावातील भरपूर पालक वर्ग उपस्थित होता.. सर्वांनी प्रचंड प्रतिसाद दिला.. त्यामुळे कार्यक्रम यशस्वी झाला.. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील असंख्य विद्यार्थ्यांनी मदत केली.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!