17.2 C
New York
Friday, May 17, 2024

Buy now

बजरंग बप्पा सोनवणे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची उद्या अंबाजोगाई येथे जाहीर सभा.!

  • बजरंग बप्पा सोनवणे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची उद्या अंबाजोगाई येथे जाहीर सभा.!
  • 🔲उपसंपादक-दिपक वाघमारे 
  • बीड प्रतिनिधी:-मा.शरदचंद्रजी पवार यांची उद्या गुरुवार दिनांक 9 मे 2024 रोजी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील मोंढा मैदान या ठिकाणी ठीक सायंकाळी 4 वाजता जाहीर सभा होणार आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या प्रचारार्थ या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
  •  बीड लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी कडून बजरंग बप्पा सोनवणे, महायुतीकडून पंकजा मुंडे तसेच वंचित कडून अशोक हिंगे निवडणूक लढवत असून यातून बीड लोकसभेसाठी त्रिशंकू परिस्थिती निर्माण झालेली आहे. दरम्यान आंबाजोगाई येथील सभेसाठी मा.आ.जयंत पाटील, मा.खा.रजनीताई पाटील, मा.आ.राजेशजी टोपे उपस्थित राहणार आहेत.
  •  मा.शरदचंद्रजी पवार यांच्या अंबाजोगाई येथील सभेतून ते नेमकं काय बोलणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सभेनिमित्त अंबाजोगाई येथे जिल्हा प्रशासनाकडून व पोलीस प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!