17.3 C
New York
Thursday, May 9, 2024

Buy now

विघ्न्हर्त्याचे आगमन सोहळ्यात सहभागी व्हा – शुभम जोशी 

विघ्न्हर्त्याचे आगमन सोहळ्यात सहभागी व्हा – शुभम जोशी 

बीड – शहरातील धोंडीपुरा परिसरातील विघ्नहर्ता मित्रमंडळाकडून गणेश उत्सव दरवर्षीच आगळ्या वेगळ्या पद्धतीने आयोजित करण्यात येतो. यावर्षी बाप्पाचा आगमन सोहळा पारंपरिक पद्धतीने ढोल ताश्यांच्या गजरात आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमात आपण सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन विघ्नहर्ता मित्रमंडळाचे अध्यक्ष शुभम जोशी यांनी केले आहे.

 

 

शहरातील विघ्नहर्ता मित्रमंडळाकडून गेल्या १० वर्षांपासून गणेश उत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही मंडळाकडून विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून आगमन सोहळा पारंपरिक पद्धतीने आयोजित करण्यात आला आहे यामध्ये ‘वज्र वाद्य पथक’ हे यावर्षीचे विघ्नहर्ता मंडळाचे मुख्य आकर्षण असणार आहे. मिरवणुकीची सुरुवात माळीवेस हनुमान मंदिर येथून होईल तर टिळक रोड, धोंडीपुऱ्या मार्गे विघ्नहर्ता चौक येथे शेवट होईल तरी या भव्य दिव्य आगमन सोहळ्यात आपण सहभागी होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन विघ्नहर्ता मित्रमंडळाचे अध्यक्ष शुभम जोशी यांनी केले आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!