15.2 C
New York
Monday, May 20, 2024

Buy now

मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवा निमित्त महाराणी ताराबाई विद्यालयांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न..

  • मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवा निमित्त महाराणी ताराबाई विद्यालयांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न..
  • मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला दिव्याच्या माध्यमातून मराठवाड्याच्या नकाशाची प्रतिकृती साकारत थोर क्रांती सेनानींना अभिवादन..
  • वडवणी प्रतिनिधी:- वडवणी शहरातील महाराणी ताराबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व प्रमोद महाजन इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा मुक्ती संग्रामाचा ७५ वा वर्धापन दिनाच्या समारंभा निमित्त रविवार दि.१७ सप्टेंबर २०२३ रोजी विद्यालयाच्या प्रांगणामध्ये ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
  • संस्कार शिक्षण मंडळाचे संस्थापक सचिव तथा चौसाळा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ.केशवराव आंधळे यांच्या शुभहस्ते सरदार वल्लभभाई पटेल व स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करून राष्ट्रीय तिरंगी ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले राष्ट्रगान झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला प्रारंभ झाला
  • या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.आ.केशवराव आंधळे तर प्रमुख अतिथी म्हणून वडवणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष अनिलदादा चोले तसेच बालरोगतज्ञ डॉ.महादर साहेब, वडवणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती दिनकररावजी आंधळे,संस्कार शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजेभाऊ वारे,वडवणी पंचायत समितीच्या मा.सभापती सौ. सुलोचनाताई आंधळे,वडवणी नगराचे नगराध्यक्ष शेषराव बापू जगताप,उपनगराध्यक्ष बन्सीभाऊ मुंडे तसेच विद्यालय मध्ये ज्यांच्या संकल्पनेतून व मेहनतीतून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ते विद्यालयाच्या शालेय समितीचे अध्यक्ष युवा नेते संजयभाऊ आंधळे,वडवणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक,युवा उद्योजक रंजीतभैय्या धस,संस्कार शिक्षण मंडळाचे संचालक,इंजि.अशोकभैय्या आंधळे आदिसह मान्यवर म्हणून उपस्थित होते बारावीच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी भाषण,देशभक्तीपर गीत, महापुरुषांच्या वेशभूषा, देशभक्तीपर गीतावर नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले त्यांच्या कलागुणांना मान्यवर व उपस्थित विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली.
    मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त प्रभात फेरी,शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांचे आयोजन गुरुवार, शुक्रवार,शनिवार रोजी करण्यात आले होते तसेच मुक्ती संग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला शेकडो दिव्याच्या माध्यमातून मराठवाड्याच्या नकाशाची प्रतिकृती साकारात मराठवाड्याच्या मुक्तीसाठी शहीद झालेल्या हुतात्म्यांना अनोखे अभिवादन केले तसेच हैद्राबाद मुक्तिसंग्राम लढ्यातील थोर क्रांतीसेनानीचे जीवन कार्यावर आधारित सह चित्रांच्या भित्तिपत्रकाचे आयोजन करण्यात आले होते याचे उद्घाटन वडवणी तहसीलचे दंडअधिकारी मा. संभाजी मंदे साहेब यांच्या शुभहस्ते रिबीन कट करून,श्रीफळ फोडून करण्यात आले या प्रसंगी वडवणी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष एपीआय मा.अमन सिरसट साहेब,वडवणी वकील महासंघाचे तालुका अध्यक्ष ॲडोकेट ताजुद्दीन,वडवणी तहसील चे नायब तहसीलदार प्रकाशनाना शिरसेवाड तसेच नायब तहसीलदार संजय जिरंगे,बीओ कार्यालयातील जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी बाबासाहेब उजगरे ,पंचायत समितीचे बी.डी.ओ विठ्ठल नागरगोजे आदींना चित्रफिती वरील क्रांतीसेनानींचा माहितीपट विद्यालयातील आदर्श शिक्षक कुलकर्णी सर यांनी उलगडून सांगितला मान्यवरांनी दिलेल्या अभिप्रायामध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे कौतुक केले,थोर क्रांतीसेनानीची ओळख नव्याने झाली कारण सचित्र वर्णन केल्यामुळे संग्रामातील चित्र जिवंत झाल्याचा प्रदर्शन पाहताना दिसून आले आमच्या जीवनातील सर्वोत्कृष्ट उपक्रम आपल्या विद्यालयात अनुभवता आला पुढील विकासाभिमुख वाटचालीस शुभेच्छा दिल्या असे विविध उपक्रम विद्यालयात घेऊन १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा केला याची वडवणी शहराच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने नोंद झाली आहे .
    या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विष्णू आंधळे सर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य मस्के सर यांनी केले तसेच या कार्यक्रमाचे आभार इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या कुरकुटे मॅडम यांनी मानले.
  • या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी तसेच सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर,शिक्षण प्रेमी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या स्तुत्य उपक्रमाची वडवणी तालुक्यात चर्चा होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!