29.7 C
New York
Wednesday, May 8, 2024

Buy now

महाराष्ट्राला मिळाले राज्यगीत:,”जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा”..!

महाराष्ट्राला मिळाले राज्यगीत:,”जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा”..!

♦️निवासी संपादक-दिपक वाघमारे

मुंबई दि,३१-महाराष्ट्राला राज्यगीत मिळाले असून त्यासंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताचा महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकार करण्यात आला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून 19 फेब्रुवारीपासून 2023 पासून हे गीत अंगिकारण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत मंत्रिमंडळात हा निर्णय मांडण्यात आला होता.

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 15 निर्णय घेण्यात आले. यामध्ये ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रत्येक राज्याला एक ठराविक गीत असावे, असे केंद्र सरकारने राज्यांना सुचवले आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील तीन गीतांची निवड झाली होती. त्यापैकी ‘गर्जा महाराष्ट्र’ या गीताची राज्यगीत म्हणून निवड करण्यात आली आहे. ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ याचे गीतकार राजा बढे आहेत. तर गायक शाहीर साबळे असून संगीतकार श्रीनिवास खळे आहेत. प्रेरणागीत, स्फूर्तीगीत म्हणून या गाण्याची ओळख असून मागील अनेक दशकांपासून अवघ्या महाराष्ट्राला या गाण्याने वेड लावले आहे.

♦️गर्जा महाराष्ट्र राज्यगीत♦️

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ.॥
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा …॥१॥

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा ॥२॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला
निढ़ळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा ॥३॥

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!