5.9 C
New York
Friday, April 26, 2024

Buy now

ह. भ. प लक्ष्मण महाराज मेंगडे यांच्या काल्याच्या कीर्तनाने पांढऱ्याचीवाडी सप्ताहाची सांगता….!

ह. भ. प लक्ष्मण महाराज मेंगडे यांच्या काल्याच्या कीर्तनाने पांढऱ्याचीवाडी सप्ताहाची सांगता….!

मुख्य संपादक – अभिजीत पवार 

बीड प्रतिनिधी – पांढऱ्याचीवाडी येथे प्रतिवर्षी प्रमाणे आयोजीत करण्यात येत असलेल्या अखंड हरीनाम सप्ताहाची काल्याचे किर्तन सेवा ह.भ.प लक्ष्मण महाराज मेंगडे ( बंकटस्वामी संस्थान मठाधिपती नेकनुर ) यांची सुश्राव्य असे किर्तन सेवा संपन्न झाली.

पांढऱ्याचीवाडी येथील चालु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता आज ह. भ. प लक्ष्मण महाराज मेंगडे यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. महाराजांनी अतिशय काल्याचे किर्तन का असते असे समजुन श्रोत्यांना सांगितले.

अभंग

दुडीवरी दुडी गौळणी सातें निघाली । गौळणी गोरस म्हणों विसरली ॥१॥

गोविंदु घ्या कोनी दामोदरु घ्या गे । तंव तंव हांसती मथुरेच्या गे ॥२॥

दुडीया माझारी कान्होंबा झाला भरी । उचंबळे गोरस सांडे बाहेरी ॥३॥

एका जनार्दनी सबलस गौळणी । ब्रह्मानदु न समाये मनीं ॥४॥

भावार्थ

भगवंताच्या नामस्मरणामध्ये रंगलेली एक गौळण गोरस भरलेले डेरे एकावर एक ठेवून मथुरेच्या बाजारांत विकण्यांकरिता गेली असता ती दही घ्या वो दही, दूध घ्यावो दूध, असे म्हणण्याचे विसरुन. गोविंद घ्या हो, दामोदर घ्या हो. असे म्हणू लागली. तेव्हां मथुरेच्या गौळणीनां या तिच्या म्हणण्यांचे आश्चर्य वाटून, ही असे काय म्हणते असे एकमेकीत बोलू लागल्या आणि तिला परमात्म्यांचा वेद लागला आहे. असा त्यांनी निश्चय केला. मथुरेच्या बायांचे ते मनोगत जाणून विकणारी म्हणाली गोविंद काय किंवा गोरस काय या दोहीचा अर्थ परमात्माच आहे. कारण सर्व त्रैलोक्य परमात्मरुप आहे. आणि तोच की, तुमच्या गांवात विकावयाला आणला आहे. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांची यथार्थ भेट झाली असता, भेट होणाऱ्याला तो आत्मरुप करुन टांकतो. म्हणजे भेट घेणारा परमात्मरुप होतो. अर्थात त्याचे सर्व व्यवहारही परमात्मरुपच असतात. असे माऊली सांगतात.

महाराजांनी त्यांच्या गोड वाणीतून भाविक भक्तांना गोड असा संदेश दिला. गोड अश्या अभंगातून भाविक भक्त किर्तन एकूण भारावून गेले. आणि गोड वाणीतून भाविक भक्तांना मंत्रमुग्ध केले.

यावेळी मृदंगसाथ ह. भ. प अमोल महाराज पवार , ह. भ. प दिनेशानंद महाराज शास्त्री, राम महाराज गायकवाड, योगेश महाराज जोगदंड, सुग्रीव महाराज चाकरवाडीकर, गायनाचार्य ह. भ. प अभिमान महाराज ढाकणे, सतिश महाराज , ह. भ. प त्रिंबक महाराज शेळके, ह. भ. प रोडे महाराज, ह. भ. प सुधाकर महाराज सिरसाठ, रज्जाक महाराज, अनुरथ महाराज श्री क्षेत्र चाकरवाडीकर तसेच महाराज मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते.

तसेच यावेळी राजेभाऊ शेळके, पत्रकार अभिजीत पवार, भा. ज. पा नेते भारत बप्पा काळे , पंचायत समिती सदस्य अनिल दादा जाधव, शिवसेनेचे तालुका संघटक गोरक्षनाथ कदम, रामायणाचार्य ताटे महाराज, तुळशीराम अप्पा, सरपंच नितिन बप्पा ताटे, मुकिंदा शेळके, पांडुरंग शेळके, आशिष लवळे, संदीप शेळके, पांढऱ्याचीवाडी ग्रामस्थ, पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठया संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!