18.1 C
New York
Wednesday, May 8, 2024

Buy now

म्युच्युअल फंड कार्यालयाचं मोठ्या थाटात उद्घाटन..!

बदलत्या काळाची गुंतवणूक……..

म्युच्युअल फंड कार्यालयाचं मोठ्या थाटात उद्घाटन…..!

बीड प्रतिनिधी – दि.26/4/2024 अमन प्लाझा बार्शी रोड बीड येथे.दिनांक 25 एप्रिल 2024 रोजी ह भ प लक्ष्मण महाराज मेंगडे मठाधिपती नेकनूर, पंढरपूर, आळंदी,ह भ प हरिहर भारती महाराज श्री गुरु गंगा भारती महाराज मोरेश्वर संस्थान कोळवाडी यांच्या शुभहस्ते, प्रा.पांडुरंग फाटक सर,Adv. महेश धांडे समन्वयक सकल मराठा समाज बीड जिल्हा,प्राचार्य रामहरी कदम (मामा), अंगद हावळे सर, नायकवाडे सर,Adv. बळवंतराव कदम, ह भ प तुळशीदास महाराज शिंदे सरपंच कोळवाडी यांच्या प्रमुख उपस्थिती बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड कार्यालयाचे उद्घाटन पार पडले.

कार्यक्रमाचे आयोजक श्री नामदेव घोडके सर (आर्थिक सल्लागार) यांनी प्रस्ताविक करताना बदलत्या काळानुसार आपली गुंतवणूक महागाईला बीट करणारी असावी हे सांगत असताना म्युच्युअल फंड हे एक गुंतवणुकीचे प्रभावी माध्यम आहे. याच्या माध्यमातून आपण बारा ते पंधरा टक्के व्याजदर मिळून आपली आर्थिक परिस्थिती सुदृढ करू शकतो. आपण कष्टाने कमावलेल्या पैशाचं आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने केले तर आपले भविष्य निश्चितच आरामदायी राहील. रिटायरमेंट नंतर आपण कष्ट न करता पैशानं पैसा कमवून आरामात जीवन जगू शकु. आपली सध्याची गुंतवणूक आपण ज्या ठिकाणी करत आहोत त्यामध्ये आपल्याला सहा टक्के व्याजदर मिळत आहे. ज्याचा महागाईमुळे आपल्या Asset मध्ये कसलीच वाढ होत नाही. आपली Asset वाढवण्यासाठी आपल्याला किमान 12 ते 15 टक्के तरी व्याजदर मिळाले पाहिजे अशा ठिकाणी आपली गुंतवणूक असायला हवी. प्रायव्हेट बँका मध्ये आपली गुंतवणूक करणे टाळली पाहिजे. रियल इस्टेट, शेअर मार्केट, म्युचल फंड अशा प्रभावी गुंतवणुकीच्या ठिकाणी आपली गुंतवणूक करायला हवी. विकसित राष्ट्र जपान अमेरिका सारख्या देशांमध्ये लोकांचा मार्केटमध्ये सहभाग 70 टक्के आहे तो आपल्या देशाचा देखील सहा/ सात टक्के वरून वाढवून आपली गुंतवणूक मार्केटमध्ये वाढवावी अशा प्रकारचा सल्ला घोडके सरांनी देऊन येणाऱ्या सर्व प्रतिष्ठित मान्यवरांचे आभार मानले.

ह भ प महंत लक्ष्मण महाराज मेंगडे, प्रा. पांडुरंग फाटक सर, Adv. बळवंतराव कदम, ह भ प तुळशीदास महाराज शिंदे यांनी शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन राजमुद्रा ग्रुपचे शिवशंकर व्हरकटे सर यांनी केले. कार्यक्रमासाठी घोडके सरांच्या विनंतीला मान देऊन सर्वच क्षेत्रातील अधिकारी, व्यापारी, नौकरदार, डॉक्टर, वकील, राजमुद्रा ट्रेकर्स ग्रुपची सर्व टीम, महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार कु नंदिनी नामदेव घोडके हिने केले.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!