15.6 C
New York
Saturday, May 4, 2024

Buy now

अंधापुरी घाट येथे”फिरता नारळी सप्ताहाची” उत्साहात सांगता..!

  • अंधापुरी घाट येथे”फिरता नारळी सप्ताहाची” उत्साहात सांगता.!
  • ह.भ.प.लक्ष्मण महाराज मेंगडे यांचे काल्याचे कीर्तन.. हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप..
  • 🔲 उपसंपादक-दिपक वाघमारे 
  • बीड प्रतिनिधी:-बीड तालुक्यातील मौजे अंधापुरी घाट येथे श्रीमद् भागवत कथा व फिरता नारळी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते, सप्ताहाची गुरुवार दिनांक 25/4/2024 रोजी ह भ प गुरुवर्य लक्ष्मण महाराज मेंगडे यांच्या अमृततुल्य अशा काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली.यावेळी पंचक्रोशीतील संत महंत,विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी तसेच महिला व पुरुष भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • समस्त गावकरी मंडळी अंधापुरी घाट यांच्यावतीने-गुरुनाम गुरु वै.प्रात स्मरणीय बंकट स्वामी महाराज यांचे शिष्य वै गुरुवर्य सुदाम देव महाराज यांनी सुरू केलेला 71 वा फिरता नारळी सप्ताहाचे अनेक वर्षांनी मौजे अंधापूरी घाट येथे आयोजन करण्यात आले होते.
  • नारळी सप्ताह निमित्त दररोज सात दिवस महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ख्यातनाम अशा कीर्तनकारांचे महान अशी कीर्तन सेवा संपन्न झाली तसेच रोज भाविक भक्तांना सप्ताह निमित्त महाप्रसाद देण्यात आला.
  • गुरुवार दिनांक 25/4/2024 रोजी सकाळी स्वामींच्या पालखीची मिरवणूक झाली व नंतर 12 ते 2 या दरम्यान  ह भ प गुरुवर्य लक्ष्मण महाराज मेंगडे मठाधिपती बंकट स्वामी संस्थान निनगूर,आळंदी,पंढरपूर यांचे अमृततुल्य असे काल्याचे किर्तन संपन्न झाले व नंतर दहीहंडी फोडून भावी भक्तांना महाप्रसाद देण्यात आला.
  • सप्ताहात सात दिवस,संत महंत, भाविक भक्त,सामाजिक, शैक्षणिक व राजकीय तसेच प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते. सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी अंधापुरी घाट ग्रामस्थांच्यावतीने विशेष परिश्रम घेण्यात आले.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!