26.7 C
New York
Wednesday, May 8, 2024

Buy now

मनोज जरांगेंचे सहकारी अमोल खुणे यांच्यावर जीवघेणा हल्ला..

मनोज जरांगेंचे सहकारी अमोल खुणे यांच्यावर जीवघेणा हल्ला..

डोकं फुटून रक्तबंबाळ; मराठा आंदोलनात सहभागी असल्यानेच हल्ला झाल्याचा आरोप..

बीड प्रतिनिधी – मराठा आरक्षणासाठी लढणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक असलेले अमोल खुणे यांच्यावर चार अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यांमध्ये अमोल खुणे यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेवराईहून आपल्या धानोरा गावी जात असताना रस्त्यात दबा धरून बसलेल्या चार जणांनी अमोल खुणे यांच्यावर अचानक दगडफेक केली आणि या दगडफेकीमध्ये अमोल खुणे यांच्या डोक्याला जबर मार लागला.

या हल्ल्यात जबर जखमी झालेले अमोल खुणे रस्त्यावर उभे असताना त्यांना काही स्थानिक लोकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!