21.3 C
New York
Wednesday, May 8, 2024

Buy now

उमेदवारांनी पोस्टर्स, पॅम्प्लेट छापण्याच्या नियमांचे कडक पालन करावे : जिल्हाधिकारी 

  • उमेदवारांनी पोस्टर्स, पॅम्प्लेट छापण्याच्या नियमांचे कडक पालन करावे : जिल्हाधिकारी 
  • बीड प्रतिनिधी:-13 मे रोजी 39 -बीड लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या पॅम्प्लेट्स, पोस्टर्स व फ्लेक्स यासह अन्य प्रचार साहित्यांवर मुद्रक आणि प्रकाशकाची नावे आणि पत्ते लिहिले असले पाहिजेत. यासह माध्यम सनियंत्रण प्रमाणिकरण समितीची मंजुरीचा जावक क्रमांक यावर असावा, असे निर्देश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दिलेले आहेत.
  • सोबतच दस्तऐवज मुद्रित केल्यानंतर ठराविक वेळेत, प्रकाशकाच्या ओळखीच्या घोषणेची प्रत असावी. दस्तऐवजाची प्रत मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडे व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवावी लागणार आहे. तरतुदीचे उल्लंघन केल्यास ६ महिन्यांपर्यंतच्या कारावासाची किंवा दंडाची, जी २ हजार रुपयांपर्यंत वाढू शकते अशा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे.
  •  मुद्रित माध्यमांमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा उमेदवाराच्या बाजूने किंवा विरुद्ध जाहिरात निवडण्याच्या प्रकरणाच्या बाबतीत, निवडणूक काळात, प्रकाशकाचे नाव आणि पत्ता प्रकरण, जाहिरातीसोबत द्यावा, असे निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत. यापूर्वी जिल्हाधिकारी यांनी याबाबत जिल्ह्यातील प्रकाशकांशी यावर चर्चा करून सूचना दिलेल्या आहेत.याबाबत असलेल्या कायदयाचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. कायद्यातील तरतुदी आणि या संदर्भात आयोगाच्या निर्देशांच्या अंमलबजावणीस जबाबदार असलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याने त्याच्या कर्तव्याचे योग्य पालन करण्यात कसूर केल्याचे आढळल्यास दंडात्मक कारवाईशिवाय कठोर शिस्तभंगाची कारवाईची तरतूद आहे.
  •  मुख्य निवडणूक अधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी याबाबतच्या आदेशातील मजकूर सर्व प्रिंटिंग प्रेसच्या निदर्शनास लिखित स्वरूपात आणून दिला आहे. उमेदवार आणि राजकीय पक्षांनी पोस्टर्स, पॅम्प्लेट आदी छापण्या संबंधी कायद्यातील तरतुदीचे पालन करावे, असे आवाहन करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी केले आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!