17.7 C
New York
Thursday, May 16, 2024

Buy now

अर्णव धृपदा – आप्पासाहेब सुरवसे सातारा सैनिकी तथा जवाहर नवोदय विद्यालयात निवड.!

  • अर्णव धृपदा – आप्पासाहेब सुरवसे सातारा सैनिकी तथा जवाहर नवोदय विद्यालयात निवड.!
  • धाराशिव प्रतिनिधी:-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जानकापूर केंद्र पारगाव वाशी जिल्हा धाराशिव येथील शाळेची उत्तुंग भरारी घेत घवघवीत यश संपादन केले आहे. सातारा सैनिकी स्कुल प्रवेश परीक्षेत अर्णव धृपदा आप्पासाहेब सुरवसे याने तब्बल 214 गुण मिळवून NSS आणि SS प्रवेश पात्रता फेरीत निवड सार्थकी ठरवली आहे. त्याचबरोबर जवाहर नवोदय विद्यालयाच्या परीक्षेत देखील उत्तीर्ण होऊन त्याचा प्रवेश नक्की खात्रीलायक झाला आहे. नवोदयच्या परीक्षेची तयारी ही सातत्यपूर्ण अभ्यासाची फलश्रुती आहे.वर्षभर सामान्य ज्ञान, चालू घडामोडी तसेच बुद्धिमता, गणित, भाषा, इंग्रजी इत्यादी विषयांचा अभ्यास सातत्याने करत यशाला गवसणी घातली आहे. महाराष्ट्र राज्य प्रज्ञाशोध मंथन अहमदनगर मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत विशेष प्रविण्यासह पारितोषिक आणि ट्रॉफी प्राप्त केली आहे.अर्णवचे कष्ट, शिक्षकांची मेहनत, पालकांची साथ, भरपूर सराव, सुयोग्य सूक्ष्म नियोजन यशाचे गमक आहे. त्याच्या सातारा सैनिकी, मंथन परीक्षा, जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा अशा तिहेरी यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी भारत बन साहेब, शाळेच्या मुख्याध्यापिका शुभदा देशमुख मॅडम, सहशिक्षक सासवडे सर, एकनाथ मोटे, केंद्रप्रमुख कांबळे साहेब, मोहिते सर,संजय देवतुळे, गणेश आदलिंगे, सतिश माळी, प्रदीप सानप, भारतीय प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त श्री सुभाषबाप्पू लाखे, मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक संजयदादा लाखे पाटील, युवा उद्योजक श्रीनिवास लाखे साहेब,शिवतेज उद्योग समूहाचे सचिन लाखे, सरपंच निर्मला लाखे,उपसरपंच लक्ष्मण लाखे, ग्रामसेवक बिरारी साहेब, अशोकदादा लाखे, संदीपभैय्या लाखे पाटील, प्रशांत तात्या ढेपे, संभाजी मोरे, प्राचार्य विकास लाखे सर, मुख्याध्यापक सतीश सर्वज्ञ सर, प्रकाश लगाडे, सेवानिवृत्त महादेव सुरवसे,प्रा. श्रीराम ढेपे, तहसीलचे अशोक सुरवसे साहेब, यांच्यासह तुकाराम माळकर, यशपाल शिंदे सर, अमोल पवार सर, साधना ताम्हाणे मॅडम, संस्कार अकॅडमी प्रमुख मिनाक्षी माळकर मॅडम, सुरेश मुसळे, माधव घाडगे, कन्हेय्या शिंदे यांच्यासह जेष्ठ शिक्षण विस्ताराधिकारी श्रीमती प्रणिता गंगाखेडकर, सोमनाथ घोलप, केंद्रप्रमुख शंकर पाटील,मुख्याध्यापक अशोक जाधव,तुकाराम सपाटे, पदोन्नत मुख्याध्यापक राजेंद्र जगताप, अर्चना सुरवसे, रत्नमाला जोगदंड, सुशील शिंदे, धोंडिबा अडागळे, अशोक जाधव, उद्धवराजे नाईकवाडे, मिलींद कुलकर्णी, उद्योजक उमेशशेठ लोढा, पत्रकार विकास नाईकवाडे, राहूल डोके, पत्रकार विकास तळेकर, कॉम. पंकज चव्हाण, मंथन केंद्र संचालक संतोष साखरे, जितेंद्र औताने,अभिजित नगरे, प्रदीप लाखे, भास्कर ढेपे, भारत बन्सी लाखे, नानासाहेब जाधव, विनोदअप्पा जाधव यांच्यासह नवजीवन शिक्षक पतसंस्थेचे श्रीराम बहिर, शिवनाथ म्हेत्रे, महारुद्र झोडगे, गोविंद वायकर सर, सतीश वाघमारे, जया सोनवणे मॅडम, मनोज कवडे, दिनकर सुरवसे यांनी अभिनंदन करून पुढील भावी शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अर्णव विविध शालेय स्पर्धा परीक्षेतून आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखवत असतो. यापूर्वी गणित इंटरनॅशनल ऑलम्पियाड परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवून विशेष प्रविण्य प्राप्त केलेले आहे. याप्रसंगी स्पर्धा परीक्षेचे पुस्तक व पेन देऊन त्याचा यथोचित गौरव करण्यात आला आहे. याप्रसंगी अर्णवच्या आई वडिलांचा देखील सत्कार करण्यात आला. अर्णवचे वडील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणीघाट ता बीड येथे कार्यरत आहेत.अर्णवच्या या तिहेरी यशा बद्दल सर्वत्र त्याचे कौतुक होत अभिनंदनांचा वर्षाव होतो आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!