23.7 C
New York
Thursday, May 9, 2024

Buy now

देऊ लागले फक्त आनंदाचा शिधा, गहू-तांदूळ गायब; अनेक राशन कार्ड धारकांची तक्रार!

देऊ लागले फक्त आनंदाचा शिधा, गहू-तांदूळ गायब; अनेक राशन कार्ड धारकांची तक्रार!

बीड प्रतिनिधी – अनेक राशन दुकानदार शासनाकडून आलेला आनंदाचा शिधा वाटप करून गहू- तांदूळ वाटपाला बगल देत असल्याची तक्रार अनेक राशन कार्डधारक करू लागले असून राशन दुकानदार कार्डधारकांचे

अंगठे दोनदा घेऊन फक्त आनंदाचा शिधा वाटप करू लागले आहे. गहू-तांदूळ देईनात म्हणून अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत.

राज्य शासनाकडून गौरी गणपती निमित्ताने राज्यातील प्रत्येक राशन दुकानावर आनंदाचा शिधा ज्यामध्ये गोडतेल, साखर, रवा आणि चणाडाळ प्रत्येकी एक किलो देण्यात येत आहे. राशन दुकानदार या चार वस्तू राशनकार्ड धारकांना देऊन अंगठे मात्र दोनदा घेऊ लागले आहेत. आनंदाचा शिधा दिला तर फक्त एक अंगठा द्यावा लागतो आणि गहू- तांदूळसाठी एक. मात्र दोनदा अंगठे घेऊन फक्त आनंदाचा शिधा ग्राहकांच्या हवाली केला जात असून गह आणि तांदूळ वाटप केला जात नाही. अशा तक्रारी अनेक ग्राहकांकडून प्राप्त होत आहे. सणासुदीच्या काळात सर्वसामान्य गोरगरिबांसाठी शासनाकडून येणारे अन्नधान्य गहू- तांदूळ त्यांना न देता दाबून ठेवण्यात येत आहे नंतर याची विल्हेवाट संबंधित राशन दुकानदार काळ्या बाजारात लावतील हे सांगण्यासाठी कोणत्याही भविष्यवेत्त्याची गरज नाही.

अशा राशन दुकानदारांची तक्रार करा : सुमित पवळे ( निलेश लंके प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य )

याविषयी  बीड तहसीलदार यांच्याशी भ्रमण ध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, दोनदा अंगठे घेऊन फक्त आनंदाचा शिधा देणाऱ्या, गहू-तांदूळ वाटप न करणाऱ्या राशन दुकानदारांच्या लेखी तक्रार करा. अशा राशन दुकान दारांवर कारवाई करण्यात येईल. तहसीलदार सुहास हजारे सुमित पवळे यांच्याशी बोलताना म्हटले आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!