15.9 C
New York
Sunday, May 19, 2024

Buy now

बीआरएस कडुन मनोज जरांगे पाटलांच्या महाराष्ट्र दौऱ्याचे स्वागत- दिलीप गोरे 

बीआरएस कडुन मनोज जरांगे पाटलांच्या महाराष्ट्र दौऱ्याचे स्वागत- दिलीप गोरे 

प्रत्येक जिल्ह्यात बीआर एस चा पदाधिकारी आणि कार्यकर्ते सोबत राहणार..

♦️निवासी संपादक-दिपक वाघमारे 

जालना :- मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रभर रान पेटविणारे मनोज जरांगे पाटलांनी नुकताच महाराष्ट्र दौऱ्याची उपोषण घोषणा केली. त्यांच्या उपोषण काळात महाराष्ट्राच्या गावागावात माता, भगिनी, युवक ,युवती आणि शेतकरी बांधवांना आपल्या आपल्या गावात उपोषणास बसून मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनास पाठिंबा दिल्याबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र च्या प्रत्येक जिल्ह्यात आणि गावात जाण्याचा निर्णय घेतला असून,मनोज जरांगे पाटलांच्या या निर्णयाचे स्वागत करून अंतरवाली गावात जाऊन मनोज जरांगे पाटलाची भेट घेऊन पुढील रणनीती विषयी चर्चा करून बीआरएस चा पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रत्येक जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभा राहील अशी ग्वाही बीआरएस चे बीड जिल्हा समन्वयक तथा माजी नगराध्यक्ष दिलीप गोरे यांनी अंतरवाली मनोज जरांगे पाटलांना दिली..

याबाबत माहिती अशी या विषयावर चर्चा करताना दिलीप गोरे म्हणाले की सर्वात महत्त्वाचे म्हणजे..

बीआरएस पक्षाने तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मराठ्यांचा ओबीसी प्रवर्गामध्ये मध्ये समावेश केलेला आहे.भारत राष्ट्र समिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव साहेब व त्यांचा बी आर एस पक्ष हा मराठा आरक्षणाला पूरक असून समर्थन देत आहे.तसेच मराठ्यांना मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा राज्यात 12 टक्के आरक्षण दिलेल आहे….

बी आर एस पक्ष हा वंचित पीडित घटकांना गरजेनुसार सर्व जाती धर्मांना आरक्षण देऊन तेलंगणामध्ये गुण्या गोविंदाने राज्यकारभार करत आहे. मग हे महाराष्ट्रात का होत नाही किंवा सरकार का करीत नाही..मनोज जरांगे पाटलांच्या महाराष्ट्र दौऱ्याचे स्वागत करत पाठिंबा देण्याकरता बीआरएस चे जिल्हा समन्वयक दिलीप गोरे, बीआरएस चे जेष्ठ नेते नाना पवार,कमलाकर नाना लांडे,वशिष्ठ जिजा बेडके,लहूराव गायकवाड, विनोद पाटील, गणेश पवार,पप्पू लोंढे,दता उगले,आदी अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटलांशी मराठा आरक्षणावर पुढील रणनीती विषय चर्चा करून त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यास जाहीर पाठिंबा देत महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यात गावागावातील बी आर एस चा पदाधिकारी आणि कार्यकर्ता मराठा आरक्षणाच्या या आंदोलनात सहभागी होतो आणि पुढे सुध्दा त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात खांद्याला खांदा लावून सोबत असणार अशी चर्चेदरम्यान ग्वाही बीआरएस च्या वतीने बीड जिल्हा समन्वयक दिलीप गोरे यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिली यावेळी बी आर एस चे बीड जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!