16.7 C
New York
Thursday, May 9, 2024

Buy now

अंबादास दानवे, किशोर पोतदार व अनिल जगताप यांच्या उपस्थितीने कोल्हारवाडीत आनंदोत्सव!

अंबादास दानवे, किशोर पोतदार व अनिल जगताप यांच्या उपस्थितीने कोल्हारवाडीत आनंदोत्सव!

बैलपोळा सण साजरा करून साधला शेतकऱ्यांशी मुक्त संवाद

बीड प्रतिनिधी – आपल्या कृषी संस्कृतीमध्ये बैलपोळा सणाचे मोठे महत्त्व आहे. शेतीला आधुनिकता प्राप्त होत असतानाही बळीराजाचे बैलांसोबत पूर्वापार चालत आलेले अनोखे नाते कधीही लुप्त होणार नाही. हा स्नेहांकीत बंध वृद्धिंगत करण्यासाठी काल दि. 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12.00 वाजताच्या सुमारास कोल्हारवाडी येथे विरोधी पक्षनेते विधानपरिषद अंबादास दानवे, शिवसेना (उबाठा) जिल्हा संपर्कप्रमुख किशोर पोतदार आणि जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैलपोळा सण मोठ्या आनंदोत्सवात साजरा करण्यात आला. सर्जा राजाची विधिवत पूजा करून उपस्थित सर्व शेतकरी बांधवांना पशुधनाच्या साथीने देशाची, महाराष्ट्राची अखंड प्रगती होत राहो अशा शुभेच्छा अंबादास दानवे, किशोर पोतदार आणि अनिलदादा जगताप यांनी दिल्या. बैलपोळा सण साजरा करण्यासाठी खास कोल्हारवाडी येथे एकाचवेळी अंबादास दानवे, किशोर पोतदार आणि अनिलदादा जगताप एकत्रित आल्याने गावाकऱ्यांचा यंदाच्या बैलपोळा सणाचा आनंद द्विगुणित झाला होता. सर्वत्र गावात आनंदाचे वातावरण पाहवयास मिळाले.

दरम्यान अंबादास दानवे, किशोर पोतदार यांच्यासह कोल्हारवाडी येथील शेतकरी बांधवांशी मुक्त संवाद साधला. त्यांच्या समस्या अडचणी समजून घेतल्या. पावसा अभावी सर्वत्र दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली असल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झालेला आहे. यावर लवकरच शासन दरबारी पाठपुरावा करून शेतकरी बांधवांवर आलेल्या संकटाचे ओझे रिकामे करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असल्याचा विश्वास यावेळी उपस्थित ग्रामस्थ, शेतकऱ्यांना देण्यात आला.

याप्रसंगी शिवसेना महिला आघाडी, युवा सेना, सर्व अंगीकृत संघटनांचे सर्व आजी-माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी, शिवसैनिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येमध्ये उपस्थित होते.

कोल्हारवाडीतील गावाकऱ्यांनी समस्यांचा टाहो फोडला!

बैलपोळा सण साजरा झाल्यानंतर ग्रामस्थ शेतकरी बांधवानी पक्षनेते विधानपरिषद अंबादास दानवे, शिवसेना (उबाठा) जिल्हा संपर्कप्रमुख किशोर पोतदार आणि जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांच्यासमोर आपल्या समस्यांचा टाहो फोडला. सरकारच्या पोकळ योजना, प्रशासकीय अध्याकाऱ्यांची गैरहजरी व टाळाटाळ, खात्यात योजनेचा पैसा वेळेवर जमा न होणे यासारख्या असंख्य अडचणी आणि समस्या कोल्हारवाडीतील गावाकऱ्यांनी मांडल्या व आपली खदखद व्यक्त केली. दरम्यान ग्रामस्थांसमोर अंबादास दानवे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांचा समाचार घेतला व इथून पुढे कोल्हारवाडीतील एकही ग्रामस्थास त्रास होता कामा नये अशी समज दिली. पोकळ आणि कागदोपत्री असणाऱ्या योजनांबाबत लवकरच आपण शासन दरबारी आवाज उठवू असा शब्द यावेळी अंबादास दानवे यांनी गावकऱ्यांना दिला.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!