6.6 C
New York
Saturday, April 27, 2024

Buy now

वर्गणी मागताय तर; परवानगी घेतली का ?

वर्गणी मागताय तर; परवानगी घेतली का ?

बीड प्रतिनिधी – गणेश चतुर्थीपूर्वी मंडळांची ढोल पथक, मंडप आदी तयारी सध्या सुरु आहे. लाखो रुपये खर्च केल्यानंतर मंडळांना आव्हान असते ते वर्गणी . जमा करून पैशाची जमावाजमव करणे. मात्र, अनेक वेळेस गणेश मंडळे या कार्यक्रमांच्या नावाखाली वर्गणी जमा केल्याची प्रकरणे घडतात. दरम्यान, वर्गणी मागण्यासाठी धर्मादाय उपायुक्त कार्यालयाकडून कलम ४१ क नुसार तात्पुरती परवानगी घ्यावी लागते. अन्यथा अनेक कलमांनुसार बेकायदेशीर वर्गणी जमा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असल्याचे धर्मादाय कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

वर्गणी, देणगी साठी हवी परवानगी

कार्यक्रमासाठी आर्थिक साहाय्य म्हणून विविध मंडळांकडून देणगी स्वरुपात मंडळ पावतीच्या नावे रक्कम जमा केली जाते. मात्र, वर्गणी मागण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपाचा परवाना घ्यावा लागतो. अन्यथा नियमानुसार विनापरवाना देणगी मागणे गुन्हा ठरत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

नवीन मंडळ स्थापन झाले असेल तर त्यांना मंडळाचा ऑर्डर रिपोर्ट तयार करून घ्यावा लागतो. दुसरे, तिसरे वर्ष असेल तर मागील वर्षाच्या पत्रकाप्रमाणे धर्मादाय उपायुक्तांकडे अर्ज करावा लागेल.

ऑनलाइन अर्ज कसा कराल?

मंडळाच्या अध्यक्षाने परवानगीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाकडून वेबसाइट उपलब्ध आहे. चॅरिटी महाराष्ट्र नावाने तीन विविध वेबसाइट आहे. मंडळाने तीनपैकी एका वेबसाइटवर मंडळाची माहिती व मंडळ सदस्यांचे आधार कार्ड • अपलोड करायचे आहे. हे अर्ज धर्मादाय उपायुक्त कार्यालयाकडे जमा होतात.

ही कागदपत्रे आवश्यक

मंडळ परवाना काढण्यासाठी मंडळ अध्यक्ष सर्व सदस्यांचे आधार, पॅन, स्वयंघोषणा पत्र, कार्यकारी मंडळ ठराव आवश्यक आहे.

मागील वर्षीचे हिशेबपत्र, शिफारसही आवश्यक

मंडळाला दरवर्षी नवे परवाना पत्रक * देण्यासाठी मागील वर्षीचे हिशेबपत्र व शिफारसही आवश्यक करण्यात आले आहे. तसेच नवे परवाने मिळवण्यासाठी मंडळाला वेळ द्यावा लागणार आहे. मंडळ अध्यक्ष व • सर्व सदस्यांशी चर्चा करून त्यांना नियमाची कल्पना देऊनच परवाना दिला जात आहे.

…..तर होऊ शकतो गुन्हा दाखल 

परवाना मंडळाच्या नावाखाली देणगी मागण्याचा प्रकार चालत असेल, तर अशांविरुद्ध कारवाई करण्यात येत • आहे. गणेश चतुर्थीनंतर अनेक वेळेस मंडळाशी संबंध नसलेले अनेक जण वर्गणी जमा करतात. धर्माच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणे, दिशाभूल करून पैसे जमा करणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येतो.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!