18.1 C
New York
Wednesday, May 8, 2024

Buy now

सुदामदेव बाबा आणि माऊली दादा एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत सहदेव महाराज शास्त्री यांचे प्रतिपादन…

सुदामदेव बाबा आणि माऊली दादा एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत सहदेव महाराज शास्त्री यांचे प्रतिपादन…

बीड प्रतिनिधी – विसाव्या शतकातील महान संत विभुती वै. ह. भ. प ज्ञानेश्वर माऊली महाराज श्री क्षेत्र चाकरवाडीकर यांच्या कृपा आशिर्वादाने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह व गुरूवर्य तपोनिधी बाळनाथ महाराज पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने दिनांक २९ ऑगस्ट रोजी ह. भ. प सहदेव महाराज शास्त्री ( मांडवजाळी ) यांची दुसऱ्या दिवसाची किर्तन सेवा संपन्न झाली. या जगाला भगवंताची भक्तीची ओढ कशी लागेल यासाठी हरिभजने जग ढवळून काढले पाहिजे. या जीवनाचे मर्म कळाले की हरिचे चिंतन नामस्मरण नाम संकीर्तन करण्याचे सामर्थ्य आपोआप प्राप्त होते..! जगदगुरु तुकोबाराय निळोबाराय यांना अनुग्रह देण्यासाठी वैकुंठीहुनी आले आणि निळोबाराय यांना अनुग्रह दिले. असा हा भक्तीचा तारक मुनी तुकोबाराय आहे म्हणून निळोबाराय म्हणतात.चाकरवाडी म्हणजे प्रती पंढरपूर आहे, माऊली महाराजांच्या सानिध्यात किर्तन करणयाचे भाग्य पूर्वी जन्माचे पुण्य आहे की काय असे महाराजांनीच आपल्या वाणीतून भाविकांना संदेश दिला. ज्ञानदेव नावाचा सतत जप केला तर नक्की तुम्हाला देव भेटल्याशिवाय राहणार नाही.

शरीरामध्ये एक च जागा देवासाठी शिल्लक ठेवलेली आहे ती जागा म्हणजे अंतकरण आहे. पृथ्वी, आप ( पाणी ) , तेज, वायू,आकाश, अशा पाच तत्वा पासुन आपले शरीर बनले आहे.ब्रम्हज्ञानाचा हा निजठेवा आपल्या जीवनात वसंत फुलवणारे संत तुकाराम महाराज आहेत. जोपर्यंत सुर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत संत तुकाराम महाराज यांची किर्ती अजरामर राहणार आहे. जळी स्थळी पाषाणी मला तुच दिसतो चैतन्य स्वरूप भगवान परमात्मा विठ्ठल यांच्या नामस्मरणाने सर्व मनोरथ पुर्ण होते.संत महिमा वर्ण किती निर्जीव चालवली भिंती . योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा.ज्ञानीयाचा राजा गुरू महाराव ! म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे !! योग्याची माऊली वैष्णवाचे अग्रगण्य असलेल्या माऊलीला सुध्दा त्या काळात समाजाने त्रास दिला. हे विश्वची माझे घर असे मती ज्यांची थोर मार्ग दाविले भक्ती पंथ ..अशी ही महान विभुति पुण्य पावन तीर्थक्षेत्र आळंदी मध्ये विसावली आहे. ब्रभुत काया असलेल्या माऊलीला सुध्दा विद्यवान पंडितांनी सांगितले की सर्व ठिकाणी देव आहे. म्हणतोस तर मग या रेड्याच्या मुखातून वेद वदवून दाखवून दे. असे ज्या वेळेस विद्यवान पंडितांनी सांगितले तेव्हा माऊलीने रेड्याच्या मस्तकावर हात ठेवताच रेडा वेद बोलू लागला. चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती.मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानदेव माझा. रेड्या मुखी वेद बोले गर्व दिजाचे हरविले.शांती रूपी प्रकटले !! चांगदेवाचे गर्व हरण करण्यासाठी माऊलीने निर्जीव असलेली भिंत चालवून दाखवली ते सदैव भगवंताचे नामस्मरण करत राहिले.अवतार तुम्हा धराया कारण उध्दराया जन जडजीवा !! आमच्या सारख्या जडजीवाचा उद्धार करण्यासाठी ईश्वराने तुकोबाराय यांच्या रूपाने अवतार धारण करून या जडजीवाचा उद्धार केला. असा हा भक्तीचा महान स्तंभ आपल्या साठी संतानी करून ठेवले आहे. त्यांची भक्ती केल्याने मन प्रसन्न होतेच. पण आमच्या जीवनात कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबाराय यांना घेऊन जाण्यासाठी जगाचा बाप पांडूरंग परमात्मा विठ्ठल आला! पण महाराज निळोबाराय यांना अनूगृह देण्यासाठी वैकुंठीहुनी आले आणि निळोबाराय यांना अनुग्रह दिले. असा हा महान तपस्वी धन्य तुकोबा समर्थ त्याने केला हा पुरुषार्थ !! त्यांनी या जगाला भगवंताची भक्तीची ओढ कशी लागेल यासाठी हरिभजने जग ढवळून काढले. या जगाचे कल्याण करण्यासाठी संतानी अवतार धारण करून या जडजीवाचा उद्धार केला.
महाराजांनी आपल्या वाणीतून भाविकांना मंत्रमुग्ध केले आणि संत कोण असतात संत काय असतात संताची महिमा काय असते असे महाराजांनी आपल्या वाणीतून भाविकांना संदेश दिला.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!