19.5 C
New York
Friday, May 17, 2024

Buy now

खरीप हंगामात शेतकऱ्यांना योग्य माहिती पुरवावी – जिल्हाधिकारी बीड

खरीप हंगामात शेतकऱ्यांना योग्य माहिती पुरवावी – जिल्हाधिकारी बीड

खरीप हंगामा पूर्व आढावा बैठक संपन्न..

🔲उपसंपादक-दिपक वाघमारे 

बीड प्रतिनिधी:- खरीप हंगामात शेतकऱ्यांना योग्य माहिती पुरवावी,असे आवाहन जिल्हा दंडाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी खरीप हंगामाच्या आढावा बैठकीत केले.

01 मे रोजी जिल्हास्तरीय खरीप हंगामा पूर्व आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, विभागीय कृषी सहसंचालक, डॉक्टर मोटे,जिल्हा कृषी अधीक्षक बाबासाहेब जेजुरकर, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, यासह अन्य कृषी विभागातील अधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा, अवकाळी पावसाचा, दुष्काळाचा सामना करावा लागतो तरी शेतकरी आशावादी राहून शेती करतात त्यांना कृषी विभागाच्या विविध खात्याकडून योग्य वेळी योग्य माहिती मिळाल्यास त्यांचा त्रास काही प्रमाणात कमी होईल,असे त्या म्हणाल्या. शासन मान्य असलेल्या आरसीएफ खतांच्या कंपनीकडून खते घेण्यात यावी असे आवाहन त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केली त्यासाठी अधिकाधिक शेत्कऱ्यांमध्ये जागृती ही करावी असेही ते यावेळी म्हणाल्या. शासनाने नॅनो युरियास प्रोत्साहन दिले असून याचा वापर करण्यासही शेतकऱ्यांना सांगावे. जिल्ह्यात ऊस मोठ्या प्रमाणात होत असून ऊसाला किती हेक्टरी किती पाणी लागते हे निश्चित नसल्याने बऱ्याचदा पाण्याचा अति वापर होतो याबद्दलचा अभ्यास करून हेक्टरी पाणी किती लागते याची माहिती द्यावी असेही त्या यावेळी म्हणाल्या.

यासह भविष्यात अधिकाधिक सेंद्रिय खताचा वापर होईल या पद्धतीचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना करावे.

प्रधानमंत्री केवायसी योजनेअंतर्गत बीड जिल्ह्याची निवड झाली असून बँकांनी शेतकऱ्यांचे ऑनलाइन खाते उघडावे असे न केल्यास बँकांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. हवामान विभागातील अधिकाऱ्यांनी यावर्षी चांगला पाऊस होणार असल्याची माहिती दिली. त्यानुसार शेतकऱ्यांनी तयारी करावी. ऑगस्ट च्या पुढील महिन्यात अधिक पाऊस होईल अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

केवीके येथील दीप्ती पाडगावकर वैज्ञानिक यांनी शेतकऱ्यांनी मातीचे परीक्षण करावे अशा सूचना केल्या बऱ्याचदा योग्य खतांचा वापर करूनही पीक येत नाही कारण जमिनीची उत्पादकता कमी झालेली असते त्याकडे शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे असेही त्या यावेळी म्हणाल्या.

खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पुढील काळात उपयोगी होईल असा चारा ठेवावा. वेळोवेळी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे अशा सूचना डॉक्टर टी एस मोटे, कृषी सहसंचालक मराठवाडा विभाग यांनी दिले. ते म्हणाले या काळात मनरेगा अंतर्गत शेततळ्यांचे काम करण्यात यावे आणि पुढील खरीप हंगाम शेतकऱ्यांना चांगले जाईल अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!