15.4 C
New York
Sunday, May 19, 2024

Buy now

पुरोगामी महाराष्ट्रात वारंवार जातीय अत्याचाराच्या घटना घडण हे मोठं दुर्देव,नगर जिल्ह्यातील घटनेचा तीव्र निषेध – नगरसेवक अँड विकासजी जोगदंड

  • पुरोगामी महाराष्ट्रात वारंवार जातीय अत्याचाराच्या घटना घडण हे मोठं दुर्देव,नगर जिल्ह्यातील घटनेचा तीव्र निषेध – नगरसेवक अँड विकासजी जोगदंड
  • बीड (प्रतिनिधी): एकीकडे भारत देशाची वाटचाल महासत्तेकडे होत आहे तर आठ दिवसापूर्वी चंद्रयान तीन मोहीम यशस्वी झाल्याने देशाच्या कानकोपऱ्यात त्याचा आंनद साजरा केला जात आहे तो केला ही पाहिजे कारण आपल्या देशाचा प्रत्येकाला अभिमान असलाच पाहिजे जग आज चंद्रावर चाललय..
  • परंतु देशाला आणि महाराष्ट्राला लागलेलं जातीयतेच ग्रहण काही सुटत नाही किंबहुना ते ग्रहण सोडविण्यासाठी
    राज्य आणि देश पातळीवर तसे प्रयत्न कुणी करत नाही महाराष्ट्रात बौद्ध,मातंग,चर्मकार, वाल्मिकी,सह आदी मागासवर्गीय समूहावर जातीय द्वेषातून अन्याय अत्याचार केले जात आहेत जातीय वादाला खतपाणी घालणारे काही किडे सारखे समाजकंटक जातीय द्वेष पसरवून समाजात तेड निर्माण करत आहेत.
  • अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे अत्याचाराच्या परीसीमा ओलाडणारी घटना घडली बौद्ध समाजातील तीन अल्पवयीन मुलांना कबूतर आणि कोंबडी चोरीच्या संशयावरून जातीय वाद्यांनी बेदम मारहाण करत झाडाला उलट टांगून अर्ध नग्न करत धिंड काढली या घटनेमुळे सबंध महाराष्ट्राची मान शरमेन झुकली आहे या घटनेचा निषेध करावा तेवढा कमी आहे
    पुरोगामी महाराष्ट्रात वारंवार अशा जातीय अत्याचाराच्या घटना घडण हे मोठं दुर्देव असून पीडितांना शासनाने मदत देऊन त्यांचे पुनर्वसन करावे तसेच आरोपींना कठोर शासन करावे अशी मागणी भिम स्वराज्य सेनेचे संस्थापक/अध्यक्ष तथा नगरसेवक अँड विकास जोगदंड यांनी महाराष्ट्राचे मा,मुख्यमंत्री, तसेच जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!