19.4 C
New York
Thursday, May 9, 2024

Buy now

अमृता भगत करणार भारताचे नेतृत्व,सौ .माधवीताई जोशि देणार मदतीचा हात”

अमृता भगत करणार भारताचे नेतृत्व,सौ .माधवीताई जोशि देणार मदतीचा हात”

आत्मविश्वासाला जोड विशेष प्रयत्नांची ‘

रायगड प्रतिनिधी – अमृता ज्ञानेश्वर भगत ही मुळ राहणार शेलू ,तालुका-कर्जत, रायगड जिल्ह्याची सुकन्या .हीची रोमानीया ह्या देशात ज्युनियर पॉवर लिफ्टिंग या स्पर्धासाठी भारताकडून निवड झाल्यानंतर तिच्या पालकांना पुढे प्रश्न पडला की रोमनियाला जायचे कसे ?हा प्रश्न त्यांनी संतोष पेरणे (पत्रकार) यांच्या पुढे मांडला व मग त्वरित त्यांना मार्ग मिळाला तो सौ माधवीताई नरेश जोशी युवा प्रतिष्ठान कडे जाण्याचा ..

अमृताचे वडीलज्ञानेश्वर भगत यांनी माधवीताई यांची भेट घेतली असून आपली अडचण सांगितली. आणि त्वरित माधवीताई युवा प्रतिष्ठान तर्फे मदतीचा हात पुढे करण्यात आला. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे .दिनांक २४ ऑगस्ट २०२३ रोजी होणाऱ्या स्पर्धेचे जाण्या-येण्याचा खर्च प्रतिष्ठान करणार असून ह्या पुढेही काही मदत लागली तर ती करण्यात येईल व अमृताला तिच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

अमृता हिला आत्मविश्वास आहे की ती भारताचे नेतृत्व करून सुवर्ण पदक घेऊन येणार आहे.सौ माधवीताई यांनी आमच्याशी बोलताना सांगितले की मावळ मतदार संघात जर खरंच कोणाला शिक्षणासाठी/स्पर्धेसाठी गरज असेल तर त्याची शहानिशा करून प्रतिष्ठान तर्फे मदत केली जाईल.मावळ मतदार संघाला आजपर्यंत पहिल्यांदाच लाभलेले दानशूर व्यक्तीमत्व .

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!