13.3 C
New York
Monday, May 20, 2024

Buy now

सद्गुरू संत किसन बाबा यांचा रौप्य महोत्सवी पुण्यतिथी सोहळा.. 

सद्गुरू संत किसन बाबा यांचा रौप्य महोत्सवी पुण्यतिथी सोहळा.. 

२४ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट आठ दिवस महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तने 

श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडीवर अवतरणार भक्तीपंढरी

कीर्तन भजन श्रवणाची पर्वणी… अखंड अन्नदान 

बीड प्रतिनिधी – २१ सद्गुरू संत किसन बाबा महाराज यांच्या रौप्य महोत्सवी पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे भव्य अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.दिनांक 24 ऑगस्ट 2023 ते दिनांक 21 ऑगस्ट 2023 या कालावधीमध्ये संपन्न होत असलेल्या भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहात महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार नामांकित व्याख्याते आणि नामांकित कलाकार यांची उपस्थिती लाभणार आहे तरी या सर्व कार्यक्रमाचा भावीक भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन महंत गुरुवर्य शांतीब्रह्म नवनाथ बाबा गोरक्षनाथ टेकडीकर यांनी केले आहे.

बीड तालुक्यातील श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे संत सद्गुरू किसन बाबा यांच्या 25 व्या पुण्यतिथी उत्सवा निमित्त या वर्षी भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. २४ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीत भव्य दिव्य उत्सव संपन्न होणार आहे.

पहाट पासूनच कार्यक्रमाची रेल चेल राहणार आहे.काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, प्रवचन,व्याख्यान, संगीत भजन,कीर्तन , हरिजागर अशे भव्य कार्यक्रम होणार आहे.पहिला दिवसाचे कीर्तन पुष्प दिनांक 24 ऑगस्ट 2023 वार गुरुवार श्री ह भ प आचार्य अमृताआश्रम स्वामी महाराज दुसऱ्या दिवसाचे कीर्तन पुष्प दिनांक 25 ऑगस्ट 2013 वार शुक्रवार श्री ह भ प चिन्मय महाराज सातारकर,तिसऱ्या दिवसाचे कीर्तन पुष्प दिनांक 26 ऑगस्ट 2023 वार शनिवार श्री ह भ प पांडुरंग महाराज घुले चोथ्या दिवसाचे कीर्तन पुष्प दिनांक 27 ऑगस्ट 2023 वार रविवार श्री हभ प निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर,पाचव्या दिवसाची कीर्तन पुष्प दिनांक 28 ऑगस्ट 2023 वार सोमवार श्री ह भ प बाळू महाराज गिरगावकर,सहाव्या दिवसाचे कीर्तन पुष्प दिनांक 29 ऑगस्ट 2023 वार मंगळवार श्री ह भ प बाळकृष्ण महाराज वसंतगडकर (दादा)

सातव्या दिवसाची कीर्तन पुष्प दिनांक 30 ऑगस्ट 2023 वार बुधवार श्री ह भ प रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक आठव्या दिवसाचे काल्याची कीर्तन पुष्प दिनांक 31 ऑगस्ट 2023 श्री ह भ प रामायणाचार्य विदर्भरत्न संजयजी महाराज पाचपोर यांचे सुश्राव्य कालाचे कीर्तन होणार आहे.

या वर्षी रोप्य महोत्सवी वर्ष असल्याने गोरक्षनाथ टेकडी संस्थान च्या वतीने विधायक उपक्रम घेत महाराष्ट्रातील नामांकित वक्त्यांची व्याख्यान होणार आहेत हवामान अभ्यासक पंजाबराव डक , विषय-हवामान शेती विषयक माहिती,बीडच्या जिल्हाधिकारी दीपाताई मुधोळ मुंडे- शिक्षण एक संघर्ष, अविनाश धर्माधिकारी – स्पर्धा परीक्षा विद्यार्थी मार्गदर्शन, माननीय श्री अण्णासाहेब मोरे- अध्यात्माच्या गोष्टी, कृष्णा जाधव उप जिल्हा अधिकारी- ज्ञानेश्वरी या विषयावर निरूपण, शिवशाहीर देवानंद माळी- सद्गुरु किसन बाबा अशांती ब्रह्मा नवनाथ बाबा यांचा पोवाडा.. असे भरगच्च कार्यक्रम राहणार आहेत..

तरी या सर्व कार्यक्रमाचा भावीक भक्तांनी आठ दिवस लाभ घ्यावा असे आवाहन महंत शांती ब्रह्म नवनाथ बाबा व श्री गोरक्षनाथ टेकडी पंचकृषीतील ग्रामस्थ भजनी मंडळी यांच्या वतीने करण्यात आले आहे. रोप्य महोत्सवी भव्य अखंड हरिनाम सप्ताहात कीर्तन भजन प्रवचन व्याख्यान व संगीत भजन यासह अखंड अन्नदानाचा यज्ञ सुरू राहणार आहे.

गोरक्षनाथ टेकडी पंचक्रोशीतील सर्व गावे आठ दिवस अन्नदान यज्ञामध्ये सहकार्य करणार आहेत. यात विशेष करून परिसरातील भाविक भक्ताकडून भाकरी भाजी व अन्नदानाची जबाबदारी घेतली आहे. स्वयंसेवक म्हणून परिसरातील युवक मंडळी उस्फूर्तपणे सहभागी होणार आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!