19.5 C
New York
Friday, May 17, 2024

Buy now

वारकरी सांप्रदायाचे चे तेजस्वी भक्तीसूर्य बंकटस्वामी महाराज आहेत राजेन महाराज भोसले यांचे प्रतिपादन…

वारकरी सांप्रदायाचे चे तेजस्वी भक्तीसूर्य बंकटस्वामी महाराज आहेत राजेन महाराज भोसले यांचे प्रतिपादन…

ज्ञान मिळवण्या करिता गरज ही श्रीगुरू आणि सद्गुरू यांची आहे

बीड प्रतिनिधी – प्रतिवर्षाप्रमाणे या ही वर्षी गुरू नाम गुरु प्रातस्मरणीय वै. श्री. गुरु ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या कृपेने व वै. श्री. गुरु बंकटस्वामी महाराज व वै. सुदामदेव बाबा व वै. शांतीब्रम्ह रामहरी महाराज यांच्या आशीर्वादाने व समस्त गावकरी मंडळी खर्डेवाडी यांच्या सहकार्याने गेल्या अनेक वर्षांपासून चालु आसलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची दुसऱ्या दिवसाची किर्तन सेवा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असे किर्तनकार ह. भ. प राजेन महाराज भोसले यांची कीर्तन सेवा संपन्न झाली.

 

शश्रीगुरुसारिखा असतां पाठीराखा ।

इतरांचा लेखा कोण करी ॥१॥

राजयाची कांता काय भीक मागे ।

मनाचिया जोगे सिध्दि पावे ॥२॥

कल्पतरुतळवटीं जो कोणी बैसला ।

काय वाणी त्याला सांगिजोजी ॥३॥

ज्ञानदेव म्हणे तरलों तरलों ।

आतां उध्दरलों गुरुकृपें ॥४॥

 

जीवब्रह्मैक्य ज्ञानदान करण्यामध्ये ईश्वरापेक्षा अत्यंत श्रेष्ठ अशा श्रीगुरूचा पाठिंबा असेल तर इतर ज्या रिद्धिसिद्धी किंवा संसारिक सुखे यांची पर्वा कोण करील. मनाप्रमाणे सर्व ऐश्वर्य भोगण्यास मिळणाऱ्या राजाच्या बायकोला भीक मागावयाला जाण्याची पाळी येईल काय? किंवा कल्पतरूखाली बसलेल्या पुरूषास काय कमी आहे. श्रीगुरू निवृत्तिरायांच्या कृपेने माझा उद्धार झाला म्हणून मी संसार समुद्रांतून पार पडलो. असे माऊली ज्ञानदेव सांगतात. या अभंगावर महाराजांनी कीर्तन चिंतनरुपी सेवा संपन्न केली.

 

माझे सदगुरू बंकटस्वामी महाराज आहेत. अभंग हा श्री गुरूंचा वर्णन करणारा अभंग आहे. आपण गुरू कोणाला ही म्हणू शकतो परंतू आपल्याला सद्गुरू आणि श्रीगुरू एकच आसतात. एखाद्या कडून चांगला गुण आपल्याला घेऊ तो आपला गुरू आहे. महाराज सांगतात गुरू करण्याला अमर्याद आहे. गुरू आणि श्रीगुरू यामध्ये खूप फरक आहे, गुरू हे चांगलं शिकवतात आणि वाईट ही शिकवण देतात.प्रभू रामचंद्र यांना सुध्दा श्रीगुरू करावे लागले होतें. वारकरी सांप्रदायिक चे तेजस्वी सूर्य बंकटस्वामी महाराज आहेत असे यावेळी महाराजांनी सांगितले ज्ञानाचे भांडार सागर असणारे ज्ञानोबाराय आहेत. ज्ञान हे पवित्र ठिकाणी सांगावे, ज्ञान मिळवण्या करिता गरज ही श्रीगुरू आणि सद्गुरू यांची आहे.

 

ज्ञान हे भगवान शंकरापासुन उत्पन्न झालं आहे. पार्वती मातेने भगबान शंकराकडे हट्ट धरला होता. त्यामूळे भगवान शंकर यांनी पार्वती मातेला म्हणाले ज्ञान हे निवांत ठिकाणी सांगावे लागते त्यावेळेस पार्वती माता आणि भगवान शंकर हे नावेमध्ये बसले आणि समुद्राच्या मध्यभागी उभा केली त्यावेळेस मी ज्ञान सांगतो माझ्या कडे दोन खोडी आहेत असे भगवान शंकर यांनी पार्वती मातेला म्हणाले त्या वेळी पार्वती माता म्हणाले कोणत्या दोन खोडी आहेत डोळे झाकल्याशिवाय ज्ञान सांगता येत नाही आणि पुढून होकार दिल्याशिवाय ज्ञान सांगता येत नाही अश्या माझ्या दोन खोड्या आहेत त्या वेळेस ज्ञान सांगण्यास सुरूवात झाली ओम ओम ओम पार्वती मातेला डोळा लागला. पार्वती मातेला डोळा लागल्यामुळे पार्वती मातेचा होकार बंद झाला अवकाशातून कवी नारायण यांनी ते पाहिले आणि त्यांनी माश्याचा रूप धारण केले आणि पार्वती मातेच्या जाग्यावर त्यांनी होकार देण्यास सुरूवात केली ज्ञान सांगण्याचे समाप्त झाले आणि भगवान शंकराने डोळे उघडले तर देव पाहतात तर काय झोपी गेलेल्या पार्वती माता दिसल्या. पार्वती मातेला ज्ञान सांगत होते ते मिळाले मच्छिंद्र नाथाला मिळाले अश्या प्रकारे महाराजांनी उपस्थीत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!