9.4 C
New York
Saturday, May 4, 2024

Buy now

नेकनुर ग्रामपंचायतच्या वतीने गुरुवारी दावत – ए- इफ्तार..

नेकनुर ग्रामपंचायतच्या वतीने गुरुवारी दावत – ए- इफ्तार

नारायण शिंदे यांची अनेक वर्षांपासूनची परंपरा

बीड प्रतिनिधी – राज्याचे कृषिमंत्री ना. धनंजय मुंडे यांचे जिवलग मित्र बालाघाटाचे विकासाभिमुख नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण बाप्पा शिंदे यांच्या कडून अनेक वर्षांपासून रमजान महिन्यात दावत -ए- इफ्तार आयोजित करून हिंदू – मुस्लिम मध्ये सलोखा कायम ठेवण्यासाठी मानव सेवा हिच ईश्वर सेवा असुन हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून रोजा इफ्तार चे अनेक वर्षांपासून अखंडपणे आयोजन करण्यात येत आहे नारायण बाप्पा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नेकनुर ग्रामपंचायतच्या वतीने दि. ४ एप्रिल गुरुवार रोजी दावत – ए- इफ्तार चे आयोजन करण्यात आले आहे. तरी नेकनुर व परिसरातील सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सरपंच सुंदर लांडगे, उपसरपंच सचिन शिंदे, सह सत्ताधारी सदस्यांनी केले आहे.

बीड तालुक्यातील बालाघाटवर नेकनुर मोठे गाव असुन येथे देश स्वतंत्र झाल्यापासुन हिंदू मुस्लिम एकता कायम असून जुन्या काळातील लोकांची परंपरा आजच्या पिढीने ही कायम ठेवली असुन गेल्या अनेक वर्षांपासून बालाघाटाचे नेते नारायण बाप्पा शिंदे यांच्या वतीने रमजान महिन्यात उपवास ठेवून ईश्वर अल्लाह ची पुजा उपासना करणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठी दावत-ए- इफ्तार चे अखंडपणे आयोजन करण्यात येत आहे. या निमित्ताने हिंदू मुस्लिम एकता अखंडता अबाधित ठेवण्यासाठी येणाऱ्या पिढीने याचा संदेश घेऊन हि परंपरा अखंडीत ठेवावी याच उद्देशाने या रोजा इफ्तार चे आयोजन करण्यात येत आहे.

 

या वर्षी ग्राम पंचायतच्या वतीने दि.४ एप्रिल गुरुवार रोजी सायंकाळी ६ -४४ वाजता ग्रामपंचायत समोर आयोजित करण्यात आले आहे तरी नेकनुर आणि परिसरातील सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सरपंच सुंदर लांडगे,उपसरपंच सचिन शिंदे,मा.प.स.स.फेरोज पठाण,ग्रा.पं.स शिवाजी शिंदे, ग्रा.पं.स अर्शद अन्वर (राजा भैय्या),ग्रा.पं.स मुजीब अतार, ग्रा.पं.स,नदीम मंडोला,ग्रा.पं.स सय्यद रिजवान, सलीम पाशा,हातेम दादा, लालू जागीरदार, मकसूद पैलवान,शाहेर शेख, फाजेल बागा,हाजी सलीम पाशा,मसूद पैलवान,जावेद बिल्डर, अय्युब मनियार,शकील भैय्या, लादेन पाशा,यांनी केले आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!