20.1 C
New York
Thursday, May 9, 2024

Buy now

जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक अण्णासाहेब लहाने सेवानिवृत्त..!

  • जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक अण्णासाहेब लहाने सेवानिवृत्त..!
  • ♦️निवासी संपादक-दिपक वाघमारे 
  • नेकनूर:-अंधापुरी गावचे सुपुत्र जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक अण्णासाहेब सखाराम लहाने हे सेवानिवृत्त झाले.1985 साली वयाच्या विसाव्या वर्षी अंधापुरी घाट या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक म्हणून अण्णासाहेब लहाने रुजू झाल्यानंतर त्यांनी आपल्या स्वतःच्या गावी म्हणजे अंधापुरी घाट या ठिकाणी शिक्षक म्हणून 24 वर्षे ज्ञानदानाचे मोलाचे कार्य केले. त्यानंतर जिल्हा परिषद शाळा मांडवखेल या ठिकाणी काही वर्षे सेवा केली तसेच केंद्रीय शाळा विठ्ठल पेठ या ठिकाणी शिक्षक म्हणून त्यांनी ज्ञानरूपी सेवा करून अनेक विद्यार्थी घडवले. शिक्षण क्षेत्रात त्यांनी अनेक वर्ष ज्ञानार्जनाचे कार्य करून मोलाचे योगदान दिले आणि ते आज सेवानिवृत्त झाले.
  • त्यानिमित्त अंधापुरी घाट येथील नागरिकांच्या वतीने व त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने नेकनूर या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला व मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची प्रतिमा भेट देऊन त्यांना पुढील आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
  •  यावेळी अंधापुरी घाट चे सरपंच पप्पू जगताप, उपसरपंच बाळू टेकडे, बाबू अण्णा टेकडे, वैभव टेकडे सोमनाथ टेकडे,लहाने कुटुंब आदि उपस्थित होते.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!