27.5 C
New York
Thursday, May 9, 2024

Buy now

“शिवसंग्रामचा बावीसावा वर्धापन दिन साजरा”

  • शिवसंग्रामचा बावीसावा वर्धापन दिन साजरा”
  • “मराठा आरक्षण व शिवस्मारकाच्या स्वप्नपूर्तीसाठी लढा देणार”…शिवसंग्राम
  •  स्व.मेटे साहेबांचे अधुरे स्वप्न पूर्ण करणार ; बीड विधानसभेवर शिवसंग्रामचा झेंडा फडकवणार- शिवसंग्राम 
  • बीड वार्ताहर :-शिवसंग्राम सामाजिक संघटनेचा बावीसावा वर्धापन दिन जिल्ह्यात गावोगावी मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम लोकनेते मेटे साहेब यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून शिवसंग्राम भवन, बीड येथे लोकनेते विनायकरावजी मेटे साहेब व महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.शिवसंग्राम संघटनेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत साहेबांची सामाजिक व राजकीय भूमिका ज्यांनी जवळून पाहिली असे साहेबांचे सहकारी व शिवसंग्रामचे शिलेदारांना सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी शिवसंग्रामचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
  •  शिवसंग्राम या सामाजिक संघटनेची स्थापना 6 जानेवारी 2002 रोजी रायगडावर लोकनेते विनायकरावजी मेटे साहेब व त्यांच्या सवंगड्याने केली . या घटनेला आज 22 वर्षे पूर्ण झाले म्हणून शिवसंग्रामचा बावीसावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला . शिवसंग्राम संघटनेच्या स्थापनेमधील त्यांचे जुने सहकारी योगेश शेळके, बळीभाऊ थापडे, कैलास शेजाळ , अखिल भाई , दशरथ भोसले, कैलास माने , सुहास पाटील, कुतुबभाई, ज्ञानेश दादा पानसंबळ, बंडू बापू शहाणे , बंडू शिंदे यांचा यथोचित स्वागत सत्कार करण्यात आले . या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना त्यांनी आज शिवसंग्रामचा महाराष्ट्राच्या राजकारणातील घटक पक्ष म्हणून समावेश आहे व शिवसंग्रामचे विधानसभेमध्ये तीन व विधान परिषद मध्ये एक अशी एकूण चार आमदार होते . हा राजकीय प्रवास वाटतो तेवढा सोपा नव्हता . तसेच स्वकर्तृत्वाने व स्वकष्टाने गोरगरीब वंचित उपेक्षित सर्व धर्मातील सवंगडी मावळ्यांना सोबत घेऊन साहेबांनी आपली सामाजिक व राजकीय वाटचाल सुरू ठेवली . वंचित उपेक्षितांना न्याय मिळावा – हक्क मिळावा . त्यांच्या अधिकार त्यांना मिळावे म्हणून या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आवाज उठवला हे करत असताना अनेक अडचणींचा सामना ही त्यांना करावा लागला परंतु कधीही डगमगले नाहीत . त्यांनी नेटाने काम करत स्वाभिमान आणि संघर्ष आपल्या मावळ्यांना शिकवला . आज त्याच्याच बळावर ही शिवसंग्राम संघटना छोट्याशा रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर झाले आहे . लोकनेते स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेब यांची अनेक स्वप्न होती त्यापैकी एक मागील निवडणुकांमध्ये बीड विधानसभा मतदारसंघातून लोकनेते मेटे साहेबांचा अगदी निसटता पराभव झाला व ही सल कार्यकर्त्याच्या मनात आज हि आहे म्हणून बीड विधानसभेवर शिवसंग्रामचा झेंडा फडकवत मेटे साहेबांचे उर्वरित स्वप्न पूर्ण करणार असा निर्धार त्यांच्या शिलेगारांनी यावेळी व्यक्त केला .
  • शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष नारायण काशीद यांनी आपले मनोगत व्यक्त करताना… मेटे साहेबांचे स्वप्न मराठा आरक्षण हे होते त्यांच्या आरंभीच्या काळामध्ये त्यांनी मराठा महासंघाच्या माध्यमातून आपल्या राजकीय आणि सामाजिक कार्याला सुरुवात केली तसेच 1998 मध्ये युती सरकारमध्ये ते आमदार झाले आणि स्वकर्तुत्वावर ते आज पर्यंत जवळपास पाच टर्म म्हणजे तीस वर्षे आमदार राहिले आणि आपल्या संघटनेचा राजकीय आणि सामाजिक वारसा जोपासला . त्यांनी विधानसभेवर तीन आमदार पाठवले . शिवसंग्रामची ही मोठी ताकद त्यांनी स्वकर्तृत्वाने उभी केली . शिवसंग्राम आज महाराष्ट्राच्या सत्तेत सहभागी आहे . यामध्ये मेटे साहेबांचे खूप मोठे योगदान आहे त्यांनी प्रत्येक कार्यकर्त्याला स्वाभिमान आणि संघर्ष शिकवला . चिकाटी -परिश्रम तसेच कठीण परिस्थितीमध्ये नेटाने काम करण्याची हिम्मत ठेवण्याची जी प्रेरणा दिली . त्याच्याच बळावर आज शिवसंग्राम मजबूत खांबासारखा उभा आहे आणि भविष्यातील आपले सर्व आव्हाने पेलण्यासाठी सज्ज आहे असेही त्यांनी म्हटले . मेटे साहेबांचे मराठा समाजातील गोरगरीब वंचित उपेक्षित समाजाला आरक्षण मिळावं यासाठी 40 वर्ष महाराष्ट्रामध्ये जनजागृती मोहिम काढली . अनेक आंदोलने केली . निवेदन दिली . उपोषण केले तसेच रस्त्यावरची लढाई लढत असताना न्यायालयीन लढाई लढले यामध्ये अनेक पुरावे स्वतः कोर्टासमोर ठेवत व वंचित उपेक्षित मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून ते प्रामाणिकपणे लढत होते . आज शिवसंग्राम आणि स्वर्गीय विनायकराव मेटे हे नाव आज महाराष्ट्राच्या घराघरातील – कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचले हे सर्व स्वतःच्या कर्तुत्वाने निर्माण केले होते . श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावं हे त्यांचे स्वप्न होते यासाठी त्यांनी विधानपरिषद व विधानसभेमध्ये अनेक वेळा मागणी केली व त्यांच्या मागणीला यश आलं आणि या स्मारकाच्या समितीचे अध्यक्ष म्हणून मेटे साहेबांची निवड झाली . त्यांनी हे काम नेटाने पुढे नेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन केले . परंतु राजकीय सत्तांतरे व श्रेयवादामध्ये हे स्मारक अडकवले गेले परंतु शिवसंग्राम छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व्हावं म्हणून भविष्यातही प्रयत्नशील राहिल .
  • याप्रसंगी शिवसंग्रामचे ज्येष्ठ नेते प्रभाकर कोलंगडे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की महाराष्ट्र मधील आजचे राजकारण पाहता अनेक मोठमोठे पक्ष फुटली परंतु शिवसंग्राम अजूनही मजबूतपणे कार्यरत आहे . शिवसंग्राम आजही मजबूत आहे आणि नेटाने काम करत आहे . याचा सार्थ अभिमान आहे . सामाजिक संघटना टिकून ठेवायची असेल तर याला राजकीय जोड दिली पाहिजे तरच संघटना टिकत असते म्हणून शिवसंग्रामने आजपर्यंत अनेक आमदार बनवले परंतु बीड मतदारसंघांमध्ये शिवसंग्रामचाच आमदार झाला पाहिजे आणि ही जागा लोकनेते मेटे साहेबांची आहे म्हणून हे उर्वरित स्वप्न मावळे पूर्ण करतील अशी अशा व्यक्त केली . प्रत्येकाने आत्मविश्वासाने आणि स्वाभिमानाने काम करा सामाजिक संघटनेमधील स्नेहबंध व ऋणानुबंध असेच जोपासत रहा यश आपलेच आहे . ग्रामीण आणि शहरी भागामध्ये काम करत असताना सर्वसामान्य वंचित उपेक्षितांना न्याय मिळावा हा साहेबांनी दिलेला वैचारिक वारसा आपण सर्वांनी जोपासावा . आपल्याला एकमेकांच्या हातात – हात देत पुढे जायचं आहे अशी अपेक्षाही यावेळी त्यांनी व्यक्त केली .
  •  याप्रसंगी शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष नारायणदादा काशीद,भारतीय संग्राम परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर आप्पा कोलंगडे,जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे,बीड तालुका अध्यक्ष नवनाथ प्रभाळे, वाहतुक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख आबेदभाई, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष अक्षय माने, किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे,सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष प्रा पंडित शेंडगे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा ऍड. मनिषाताई कुपकर,महिला आघाडी शहर उपाध्यक्षा संगीताताई ठोसर, गेवराई महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा साधनाताई दातखीळ,माजी तालुकाध्यक्ष सचिन कोटुळे,युवा नेते मनोज जाधव,बाजार समितीचे संचालक पंडित माने,शहर उपाध्यक्ष शेषेराव तांबे, युवक तालुकाध्यक्ष गणेश साबळे,अल्पसंख्यांक ज्येष्ठ नेते,शेख अखिलभाई,शेख अझरभाई,शेख लालाभाई,भटक्या जमाती सेलचे बीड तालुकाध्यक्ष हनुमंत पवार, किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे,अल्पसंख्यांक आघाडीचे शहराध्यक्ष अमजद पठाण,युवक शहराध्यक्ष प्रशांत डोरले, युवक शहर उपाध्यक्ष अनिकेत देशपांडे, विद्यार्थी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शहागडकर,पिंपळनेर गटप्रमुख गोपीनाथ बापू घुमरे,नाळवंडी गट प्रमुख बळीराम थापडे, शिवसंग्राम नेते सुनील कुटे,बंडू शिंदे,नामदेव धांडे,महादेव बागलाने,कचरू म. कदम,हरिश्चंद्र ठोसर, शहादेव काकडे,अशोक लोकरे,नितीन आगवान, सतिराम ढोले, सय्यद सलमान अली,अख्तर पेंटर, शकील खान,हरीश शिंदे,शेलार मामा,सुशांत सत्राळकर, आकाश कदम,उत्तरेश्वर यादव,रेवणनाथ घाटुळ,कुंदन गायकवाड, मुजीब इनामदार, सय्यद अजमत अली,मुन्ना खान,शेख रहीम व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
  • कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा सरचिटणीस अनिल भाऊ घुमरे यांनी केले. यामध्ये त्यांनी शिवसंग्राम संघटना तारुण्यात प्रवेश करीत असून त्याच उमेदीने व ताकतीने कार्यकर्त्यांनी कामाला लागले पाहिजे असे नमूद केले. सूत्रसंचालन सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष प्रा. पंडित शेंडगे व आभार प्रदर्शन शहर उपाध्यक्ष शेषेराव तांबे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसंग्रामचे शहर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!