18.1 C
New York
Wednesday, May 8, 2024

Buy now

अनिलदादा जगताप यांच्या मागण्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल.!

  • अनिलदादा जगताप यांच्या मागण्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल.!
  • शहरी समस्या सोडवण्यासाठी न प मुख्याधिकाऱ्यांना दिले आदेश..
  • बीड प्रतिनिधी- शहरभरात अनेक समस्या उद्भवलेल्या असून यामुळे बीड शहरवासियांना प्रचंड स्वरूपात दैनंदिन त्रास होतो आहे. नागरिकांच्या या अडचणींवर विशेष लक्ष घालत अनिलदादा जगताप यांनी काही दिवसांपूर्वी बीड जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन तात्काळ शहरभरात उद्भवलेल्या अनेक समस्या सोडवण्यात याव्यात अशी विनवणी केली होती. अनिलदादा जगताप यांनी दिलेल्या निवेदनाची आणि विनवनीची बीड जिल्हाधिकारी यांनी दखल घेत काल दि. 1 जानेवारी 2024 रोजी पत्रक काढून शहरी समस्या सोडवण्यासाठी न प मुख्याधिकाऱ्यांना आदेशीत केले आहे.
  • दि. 11 नोव्हेंबर 2023 रोजी अनिलदादा जगताप यांनी शहरात उद्भवलेल्या शहरातील समस्याबाबत बीड जिल्हाधिकारी निवेदन दिले होते. या निवेदनात अनिलदादा यांनी डेंग्यू सदृश्य गंभीर स्थिती निर्माण झाली आहे अशा परिस्थितीत बीड नगरपरिषद यांनी फवारणी अथवा कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. त्या तात्काळ करून घ्याव्यात. याचबरोबर बीड शहरात सर्वत्र मोकाट जनावर फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत त्यामुळे अपघाताचे प्रमाण व रहदारीस अडथळा निर्माण झाला आहे. हीच जनावरे नजीकच्या शेतात जाऊन रात्रीच्या वेळी शेतक-यांचे मोठे नुकसान करत आहेत. त्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा. जनावरांच्या चा-याचा, पाण्याचा व कोडवाड्याचे कंत्राट हे न. प. बीड यांनी केले आहे का? जर असेल तर त्याची माहिती घेऊन शेतकऱ्यांची ही समस्या सोडवावी. यासह सामान्य नागरिकांचे न. प. बीड येथील माहिती अधिकारातील अर्ज निकाली काढले जात नाहीत. गुंठेवारी अंतर्गत जमा झालेली शासकीय रक्कम व खर्च बाबत आपण तपशील घ्यावा. नगररचना विभागातील ना हरकत बांधकाम परवानगी बाबत आपण तपशील घ्यावा. काही ठराविक कंत्राटदारांनाच बांधकाम विभागातील काम दिली जातात त्याची आपण सविस्तर चौकशी करावी. बांधकाम विभागा अंतर्गत ऑनलाइन टेंडर वगळता इतर सु. बे. अ, ऑफलाइन कंत्राट व मंजुर सोसायटी यांच्याकडून कोणती व किती कामे झाली व त्या संदर्भातील जमा तसेच खर्च झालेल्या रकमेची माहिती घ्यावी. बीड शहरातील पाणीपुरवठा समस्याचे निवारण व्हावे. केंद्र शासनाने आपल्या बीड नगरपरिषद करिता दोन जागा मत्स्य विक्रेत्यांसाठी आंबेडकर पुतळ्यात नजीक पेठ बीड, जुनी भाजी मंडई निवडलेल्या किंवा मंजूर कलेल्या आहेत. तर त्याची अद्याप पर्यंत व्यवस्था झालेली नसल्या कारणाने संबंधित व्यापारी सार्वजनिक बांधकाम विभाग बीड येथील कार्यालया शेजारी तिथे विक्री करतात. त्या कारणाने तिथे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे तसेच सन्माननीय जिल्हाधिकारी महोदयांचे निवासस्थान देखील आहे समोरच लहान मुलांची प्रार्थमिक व माध्यमिक चंपावती विद्यालय आहे. तरी आपण मंजूर झालेल्या जागेवर मत्स्य व्यवसायाची सोय करावी.
  • बीड शहरातील स्वच्छता तसेच विद्युत पुरवठा, रहदारीच्या अडथळा होईल असे नामफलक बॅनर शासकीय जागेत लावले आहेत बीड आरोग्य अधिकारी व जिल्हा चिकित्मकालय यांच्या आखत्यारीतील निवासस्थान येथे पूर्ण अतिक्रमण झाले आहे तरी आपण शासकीय जागा सोडून घेण्यात यावी. अशा विविध मागण्यां निवेदनातून केल्या होत्या. या निवेदनाची दखल घेऊन दि. 1 जानेवारी 2024 रोजी पत्रक काढून शहरी समस्या सोडवण्यासाठी न प मुख्याधिकाऱ्यांना आदेशीत केले आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!