23.7 C
New York
Thursday, May 9, 2024

Buy now

मतदार संघाचा जनतेचीसेवा प्रामाणिकपणे काम केले म्हणूनगेवराई तालुक्यातील जनता जनार्दन माझ्या पाठीशी खंबीरपणे —शिवाजीराव पंडित

मतदार संघाचा जनतेचीसेवा प्रामाणिकपणे काम केले म्हणूनगेवराई तालुक्यातील जनता जनार्दन माझ्या पाठीशी खंबीरपणे —शिवाजीराव पंडित

================

महाराष्ट्रातील दिग्गज संत-महंतांच्या उपस्थितीत शिवाजीराव दादांचा संपन्न झाला अभिष्टचिंतन सोहळा

माजी मंत्री शिवाजीराव दादा झाले व्यासपीठा वर संतमहंताच्या चरणी नतमस्तक

गेवराई, दि.०९ प्रतिनिधी सोमनाथ मोटे सह शाम जाधव 

गेवराई तालुक्याचे भाग्यविधाते माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांचा अभिष्टचिंतन सोहळा साधू संत महंत आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मंगळवार, दि.१० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता शिवनगरी, र.भ.अट्टल महाविद्यालय, गेवराई येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.

या अभिष्टचिंतन सोहळ्यास श्रीक्षेत्र नारायण गडाचे मठाधिपती ह.भ.प.महंत शिवाजी महाराज, श्रीक्षेत्र चाकरवाडी संस्थानचे महंत ह.भ.प.महादेव महाराज यांच्यासह श्री क्षेत्र बंकटस्वामी संस्थानचे मठाधिपती ह.भ.प.लक्ष्मण महाराज मेंगडे, श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी संस्थानचे ह.भ.प.नवनाथ महाराज, श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथगड संस्थानचे ह.भ.प.जनार्धन गुरु निगमानंद महाराज, ह.भ.प.रामकृष्ण रंधवे बापू, श्री क्षेत्र रामगड संस्थानचे ह.भ.प.योगीराज महाराज, श्री क्षेत्र पांचाळेश्वर संस्थानचे प.पू.महंत श्री दर्यापुरकर बाबा, दारुलउलूम संजयनगर गेवराईचे जनाब मुफ्ती शब्बीर मौलाना, महोतमीन मदरसा अल हस्नैन, गेवराईचे जनाब मुफ्ती गयासोद्दीन जहागीरदार, पत्रकार दत्तात्रय थोरे, ह.भ.प‌. वसंत महाराज लोळदगावकर, पंचमुखेश्वर संस्थानचे महादेव महाराज, बंकटस्वामी संस्थानचे ह.भ.प. नाना महाराज कदम, ह.भ.प. रघुनाथ महाराज निंबाळकर, चिंतेश्वर संस्थानचे ह.भ.प.दिलीप महाराज घोगे, ह.भ.प सुरेश महाराज, तपेश्वर संस्थानचे ह.भ.प. गिरी महाराज, ह.भ.प. रंगनाथ महाराज, ह.भ.प. प्रकाश महाराज चव्हाण, ह.भ.प. रामेश्वर महाराज राऊत, ह‌.भ.प.बप्पा महाराज राऊत, ह.भ‌.प. विष्णू महाराज, ह‌. भ.प. संजय महाराज अंतरकर यांच्यासह पत्रकार आणि साहित्यिक दत्ता थोरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजयसिंह पंडित, युवानेते रणवीर पंडित आदींसह गेवराई तालुक्यातील सर्व संस्थांनचे महंत, साधु संत, कीर्तनकार, भजनी मंडळ तसेच भाविक भक्त आणि दादावर प्रेम करणारे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आणि गेवराईसह ग्रामीण भागातून आलेले ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रारंभी शिवाजी महाराज यांच्या आणि उपस्थित संत महंताच्याहहस्ते शिवाजीराव दादांचा ह्रदय सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविकात दत्ता थोरे म्हणाले, दादा गेवराई तालुक्याचे शक्तीपीठ आहेत आणि त्यांना आशिर्वाद देण्यासाठी साधू संतांचा मेळा जमला आहे, आज हा सोहळा शक्तीपीठ आणि भक्तीपीठा एकत्र सोहळा आहे. शिवाजीराव दादा एक अवलिया व्यक्तीमत्व आणि ईरसाल राजकारणी आहेत. गेवराई तालुकाच नव्हे तर बीड जिल्ह्याच्या विकासात ईतिहासात दादांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. दादांचा धर्म हा राजधर्म, हा न्यायाचा धर्म, लोकांच्या सेवेचा धर्म आहे. दादांच्या जे पोटात तेच ओठात, त्यामुळे त्यांचे कधी कधी नुकसान झाले पण दादांनी कधी शब्द फिरवला नाही‌. गेवराई तालुका सुजलाम सुफलाम केला. सामान्यांच्या लेकरांना शिक्षण मिळावे म्हणून शैक्षणिक चळवळ सुरू केली. दादा शिस्तीचे करडे नेतृत्व, वरुन अतिशय कडक असले तरी आतून ते खुप मायाळू व्यक्तीमत्व आहे असेही ते म्हणाले.

यावेळी दादांन उर्दू भाषेमध्ये शुभेच्छा देताना जनाब मुप्ती गयासुद्दीन म्हणाले की, मला खुप आनंद झाला, उर्दू भाषेमध्ये दादांच्या कार्याबद्दल मला बोलण्याचे भाग्य उपलब्ध झाले. शिक्षण आणि आरोग्य व ईतर अनेक क्षेत्रात दादांचे काम मोठे आहे. भगवान और अल्ला दादा को सौ साल की उमर, हिंमत, ताकद दे असेही ते यावेळी म्हणाले.

लक्ष्मण महाराज मेंगडे म्हणाले की, ज्यांची जिल्ह्यावर पकड त्यांना दादा म्हणावे, शिवाजीराव दादांची सर्व क्षेत्रावर पकड आहे. दादांच्या जीवनात अन्नदान, ज्ञान दान झाले. राजकीय, धार्मिक, सामाजिक क्षेत्रातील आदर्श नेतृत्व शिवाजीराव दादांची शताब्दी साजरी व्हावी हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो.

सत्काराला उत्तर देण्यासाठी उभे राहुन शिवाजीराव दादा व्यासपीठावरच संतमहंताच्या चरणी नतमस्तक झाले. भाऊक होऊक त्यांनी फरड्या आवाजात बोलायला सुरुवात केली, अवघाची संसार सुखाचा करीन या संतविचाराने काम केले. प्रामाणिक काम केले म्हणून जनता माझ्या पाठीशी आहे. कीशनराव हिंगे, डॉ. शिखरे, रामराव चव्हाण यांच्यासारखे एकनिष्ठ लोक मला लाभले म्हणून मी हे काम करु शकलो. शेवटी बोलताना दादा भाऊक झाले, डोळे भरुन आले, भावना अनावर झाल्या….त्यांचे बोलने थांबले…आणि थरथरत्या देहबोलीने विराजमान झाले.

याप्रसंगी बोलताना विजयसिंह पंडित म्हणाले की, दादांच्या या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या अराजकीय कार्यक्रमाला खुप मोठ्या संख्येने संत, महंत आणि मौलाना, गेवराई तालुक्यातील सर्व शिवछत्र आणि दादावर प्रेम करणारी लहानथोर मंडळी जमली. या कार्यक्रमामुळे आम्हाला काम करण्याची उर्जा मिळाली. दादांचा वारसा आम्ही सक्षमपणे चालवू, याचे मार्गदर्शन आम्हाला या सोहळ्यातून मिळाले, यापुढील काळातही आम्ही असेच कार्यक्रम घेऊ अशी ग्वाही दिली.

यावेळी बोलताना ह.भ.प‌ महादेव महाराज म्हणाले की, संतविचाराच्या भावनेतून दादांनी काम केले. शिवछत्र परिवाराला वारकरी सांप्रदायाचा अशिर्वाद लाभला त्यामुळे निती, सदाचाराने शिवछत्र परिवार वागत आहे. आर्थिक शैक्षणिक, सांस्कृतिक अशा अनेक विधायक कामे दादा आणि शिवछत्र परिवाराकडून घडलेले आहेत दादांनी सामाजिक कामातूनच परमार्थ घडल. यापुढील काळातही त्याच्या हातात हे पुण्याचे काम घडेल. माऊली संस्थानशी शिवछत्र परिवाराचा भकृतीभाव आहे. येणा-या काळात दादांचा शक्ती महोत्सव होवो असा आशीर्वाद महादेव महाराजांनी दिला.

याप्रसंगी विविध संस्था, संस्थान आणि पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच दादांच्या हितचिंतकांनी दादांच्या ह्रदय सत्कार केला. कार्यक्रमाचे आभार अभिष्टचिंतन सोहळा समितीने यांनी मानले.

अभिष्टचिंतन सोहळ्यास साधु, संत, विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!