7.1 C
New York
Thursday, January 15, 2026

Buy now

spot_img
spot_img

आय.पी एस पंकज कुमावत साहेबांची उदंड वडगाव येथे दबंग कारवाई…!

आय.पी एस पंकज कुमावत साहेबांची उदंड वडगाव येथे दबंग कारवाई…!

एकुण किमती 51 लाख 20 हजार रुपयाचा माल ताब्यात..

मुख्य संपादक – अभिजीत पवार

बीड प्रतिनिधी – सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत साहेब यांची पहाटेच्या दरम्यान उदंड वडगाव येथे दबंग कारवाई करण्यात आली आहे. दि. 03 – 02 – 2023 रोजी मा. सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत साहेब यांना गुप्त बातमी द्वारा द्वारे माहिती मिळाली की दि. 04 – 02- 2023 रोजी पहाटे ट्रक क्रमांक GJ 12 AY 9425 या ट्रक मध्ये गोवा गुटख्याचा माल बसव कल्याण येथे भरून तो बीड रोड ने मांजरसुंबा मार्गे बीड येथे जात आहे. अशी माहिती मिळाल्यावर सदरची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकातील पोलीस अंमलदार यांनी दि. 04 फेब्रुवारी 2023 रोजी पहाटे सोलापूर, बीड रोडवर उदंड वडगाव येथे रोडवर ट्रक थांबून सदर ट्रक चालक यांना ताब्यात घेतले. ट्रकची पाहणी केली असता ट्रकमध्ये गोवा गुटख्याचे 40 मोठे बोध प्रत्येक बोधा मध्ये चार पोते असे एकूण 160 होते किमती 36 लाख रुपये ट्रक किंमत पंधरा लाख रुपये दोन मोबाईल 20000रु असा एकूण किमती 51 लाख वीस हजार रुपयाचा माल ताब्यात घेऊन पोलीस ठाणे नेकनूर येथे पोलीस हेड कॉन्स्टेबल बालाजी दराडे यांच्या फिर्याद वरून ट्रक चालक वजीर इम्रान गुल मोहम्मद, सोबत असणारा किन्नर समीर सुलेमान नोतियार यांना ताब्यात घेऊन नेकनूर ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

परत एकदा सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत साहेबांनी अवैध धंद्यावर कारवाई केल्याने अवैधे धंदे चालकाचे धाबे दणाणले आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकूर साहेब अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर मॅडम सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल बालाजी दराडे बाबासाहेब बांगर, राजू वंजारे, विकास चोपणे, संजय टुले, दिलीप गीते, अनिल मंदे, सचिन अहकारे यांनी केली आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!