19 C
New York
Sunday, May 19, 2024

Buy now

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून मविआचे विक्रम काळे चौथ्यांदा विजयी..!

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून मविआचे विक्रम काळे चौथ्यांदा विजयी..!

निवासी संपादक-दिपक वाघमारे

औरंगाबाद दि,३- मराठवाड्यासह राज्याचे लक्ष लागून असलेल्या औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाचा अंतिम निकाल लागला आहे ज्यात राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे यांनी चौथ्यांदा विजयाचा गुलाल उधळला आहे. तर भाजपचे उमेदवार किरण पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. विक्रम काळे यांना 23 हजार 580 मतं मिळाली असून, किरण पाटलांना 16 हजार 643 मते मिळाली आहेत ज्यामुळे विक्रम काळे यांचा 6 हजार 937 मतांनी विजय झाला आहे.

सकाळी आठ वाजेपासून मराठवाडा शिक्षक मतदार संघाच्या मतमोजणीला सुरुवात झाली होती. मात्र पहिल्या पसंतीच्या मतमोजणीत कोणत्याही उमेदवाराला कोटा पूर्ण करता आला नसल्याने, दुसऱ्या पसंतीची मतमोजणी करण्यात आली. दरम्यान दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत विक्रम काळे यांनी सर्वाधिक 23 हजार 580 मत मिळवल्याने त्यांचा विजय झाला आहे. विशेष म्हणजे गेल्या 18 वर्षांपासून मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या विक्रम काळे यांचा हा सलग चौथा विजय आहे.

महाविकास आघाडीकडून जल्लोष..!

दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत सुरुवातीपासूनच विक्रम काळे यांनी आघाडी घेतली होती. पुढे आघाडी मतांचा आकडा वाढत गेला. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात देखील काळे यांच्या मताची आघाडी कायम होती. त्यामुळे निकालापूर्वीच महाविकास आघाडीकडून जल्लोष साजरा करण्यात आला. ठाकरे गटाचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांनी विक्रम काळे यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच काळे यांच्या समर्थकांकडून गुलाल उधळत विजय साजरा करण्यात आला. तर काही कार्यकर्त्यांनी आतिषबाजी करत आनंद साजरा केला.

विक्रम काळे यांचा चौथ्यांदा विजय..!

कधीकाळी मराठवाडा शिक्षक संघाच्या ताब्यात असणाऱ्या या मतदारसंघात 2004 मध्ये राष्ट्रवादीचे वसंत काळे आपल्या ताब्यात घेत, राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला. तेव्हापासून हा मतदारसंघ कायम राष्ट्रवादीकडेच राहिला आहे. तर 6 जानेवारी 2010 ते 5 डिसेंबर 2016 पर्यंत विक्रम काळे या मतदारसंघात विजयी होऊन महाराष्ट्र विधान परिषदेत पहिल्यांदा गेले. त्यानंतर 8 फेब्रुवारी 2017 मध्ये पुन्हा दुसऱ्या वेळेस निवडुन आले. त्यानंतर 2017 ते 2022 पर्यंत ते तिसऱ्यांदा औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून निवडणून आले होते. आता पुन्हा एकदा त्यांनी विजय मिळवत चौथ्यांदा मराठवाडा शिक्षक मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात ठेवला आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!