19.5 C
New York
Friday, May 17, 2024

Buy now

काळेगाव घाट येथील जिल्हा परिषद शाळेत केंद्रीय शिक्षण परिषद संपन्न…

  • काळेगाव घाट येथील जिल्हा परिषद शाळेत केंद्रीय शिक्षण परिषद संपन्न…
  • मुख्य संपादक – अभिजीत पवार 

केज प्रतिनिधी – केज तालुक्यातील काळेगाव घाट येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केंद्रीय शिक्षण परिषद संपन्न

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक १ फेब्रुवारी २०२३ रोजी केंद्रीय शिक्षण परिषद काळेगाव घाट जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भीम नगर वस्ती येथे आयोजित करण्यात आली होती.

या शिक्षण परिषदेचे उद्घाटक म्हणून जिल्हा परिषद बोरगाव शाळेचे मुख्याध्यापक शिवाजीराव देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून काळेगाव घाट केंद्राचे केंद्रप्रमुख तथा केंद्रीय मुख्याध्यापक बळीरामजी थोरात, जिल्हा परिषद मस्साजोग शाळेचे माजी मुख्याध्यापक कोथिंबीरे सर या शिक्षण परिषदेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून जोडले सर, बालासाहेब यादव सर, केदार सर, विस्तार अधिकारी साठी साहेब, केंद्रप्रमुख बळीरामजी थोरात साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती.

सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते शिक्षण परिषदचे उद्घाटन करण्यात आले.

या शिक्षण परिषदचे मार्गदर्शक डोरले सर, बालुशाही यादव सर, केदार सर, विस्तार अधिकारी चाटे साहेब, बळीरामजी थोरात साहेब यांनी शिक्षण परिषदेत उपस्थित शिक्षक, शिक्षिका यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यादव सरांनी व अनूमोदन निलेश तारळकर सर यांनी केले. तर उपस्थित मान्यवरांची व शिक्षक आणि शिक्षिकेचे आभार लांब सर यांनी मानले.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!