13.6 C
New York
Sunday, May 25, 2025

Buy now

spot_img
spot_img

बप्पा ..! चंदन घेऊन जाणाऱ्या कार्यकर्त्याला अभय कोणाचे?

  • बप्पा ..! चंदन घेऊन जाणाऱ्या कार्यकर्त्याला अभय कोणाचे?
  • शरद चंद्र पवार गटाचा नगरसेवक..
  • बीड प्रतिनिधी – बीड जिल्हयातील केज तालूक्यात चंदन तस्करीची घटना उघडकीस आली आहे. केज पोलिसांनी चंदनाची चोरटी वाहतून करणारा एक टेम्पो ताब्यात घेतला आहे. सदर प्रकरणी वन अधिनियम व भारतीय दंड विधानानुसार गुन्हे दाखल करुन पुढील तपास केला जाईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी दिली आहे. या टेम्पो मध्ये तब्बल २ कोटी 18 लाख रुपये किंमतीचे अंदाजे सव्वा टन चंदन जप्त करण्यात आले आहे. या टेम्पोच्या चालकाला अटक करण्यात आली असून हे चंदन शरद पवार गटाचे नगरसेवक बालाजी जाधव यांचे आहे. बालाजी जाधव हे बीड लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचे कार्यकर्ता आहेत. सध्या निवडणुकांची आचारसंहिता असल्याने पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. ठिकठिकाणी वाहनांची तपासणी केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील केजमध्ये पोलिसांनी टेम्पोची तपासणी केली असता, चंदनतस्करी उघड झाली आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!