32.4 C
New York
Sunday, July 20, 2025

Buy now

spot_img
spot_img

बप्पासाहेब घुगे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा सरचिटणीस पदी निवड…

बप्पासाहेब घुगे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा सरचिटणीस पदी निवड…

बीड प्रतिनिधी – 27 ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाची बीडमध्ये भव्य सभा झाली. या सभेमध्ये गोल्डमॅन म्हणून ओळख असलेले बप्पासाहेब विश्वनाथ घुगे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटामध्ये जाहीर प्रवेश झाला. अगदी काही दिवसांमध्ये त्यांच्यावर पक्षश्रेष्ठींनी एक जबाबदारी दिली आहे. त्यांचे काम पाहता पक्षाकरिता तळमळ धडपड पाहता प्रदेशाध्यक्ष मा. खा.सुनीलजी तटकरे व मा.ना. श्री धनंजयजी मुंडे यांच्या सूचनेप्रमाणे बप्पासाहेब घुगे यांची बीड जिल्हा सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे. ही जबाबदारी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विचारानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून एकनिष्ठता तसेच आचरण व विचाराद्वारे समाजात पक्षाच्या पद प्रतिष्ठेची जपवणूक व जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यास अग्रेसर राहील हीच अपेक्षा यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी बोलताना व्यक्त केली आहे. यावेळी राज्याचे कृषिमंत्री धनंजयजी मुंडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देत बप्पासाहेब घुगे यांची बीड जिल्हा सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे बप्पासाहेब घुगे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!