13.3 C
New York
Monday, May 20, 2024

Buy now

गर्जा महाराष्ट्र मोरया ही सांस्कृतिक चळवळ जिल्ह्याच्या कलाक्षेत्रासाठी भरीव कामगिरी – जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे

  • गर्जा महाराष्ट्र मोरया ही सांस्कृतिक चळवळ जिल्ह्याच्या कलाक्षेत्रासाठी भरीव कामगिरी – जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे
  • गर्जा महाराष्ट्र मोरया जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेचा उदघाट्न सोहळा थाटामाटात संपन्न.!
  • ♦️निवासी संपादक-दिपक वाघमारे 
  • ===================
  • बीड, दि,26:- गणेश उत्सवानिमित्त बीड शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांनी बाल कलाकारांसाठी उभारलेली गर्जा महाराष्ट्र मोरया ही सांस्कृतिक चळवळ जिल्ह्याच्या कलाक्षेत्रासाठी भरीव कामगिरी करणारी असणार आहे. कारण या सांस्कृतीक चळवळीतून बीड जिल्ह्यातील बाल कलाकारांच्या कलागुणांना चालना मिळणार आहे. याबरोबरच इथे उपस्थित शिक्षकांना माझे आवाहन आहे की त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये भारतीय नृत्य संस्कृतीचे मूल्य रुजवावीत ज्यामुळे या नवं बाल कलाकारांना भारतीय नृत्य संस्कृतीची माहिती मिळेल आणि त्यांच्या कडून भारतीय नृत्य संस्कृतीचा वारसा जपला जाईल असे वक्तव्य बीड जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी गर्जा महाराष्ट्र मोरया जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेच्या उदघाट्न सोहळ्या दरम्यान केले.
  •  कला प्रेमींच्या खास आग्रहास्तव बीड शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप यांनी गणेश उत्सवानिमित्त दि. 26 सप्टेंबर आणि 27 सप्टेंबर या दोन दिवशी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य दिव्य जिल्हास्तरीय गर्जा महाराष्ट्र मोरया जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन केले आहे. दि. 26 सप्टेंबर रोजी सकाळी 11.00 वाजताच्या दरम्यान नटराज, छत्रपती शिवाजी महाराज, हिंदूहृदयसम्राट शिवसेना पक्षप्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे, स्व मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून गर्जा महाराष्ट्र मोरया या स्पर्धेचे उदघाट्न बीड जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. या उदघाटन सोहळ्यासाठी बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, न प मुख्याधिकारी नीता अंधारे, जि. प प्राथमिक शिक्षनाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक नागेश चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी उल्हास गंडाळ, दै वास्तवचे संपादक जितेंद्र सिरसाठ आणि दै झुंजार नेताचे कार्यकारी संपादक आकाश वरपे यांची विशेष उपस्थिती होती. या स्पर्धेसाठी जिल्ह्याभरातील शेकडो शाळेतून हजारो विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला असून अनिलदादा जगताप आयोजित गर्जा महाराष्ट्र मोरया जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेला स्पर्धाकांचा भरगच्च प्रतिसाद मिळाला आहे. याप्रसंगी विविध शाळेच्या मुख्यद्यापक, शिक्षक, बाल कलाकार तथा शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांच्या मोठ्या संख्येत उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचलन लक्ष्मण बहिरवाल यांनी केले.
  • गर्जा महाराष्ट्र मोरया ही केवळ सांस्कृतिक चळवळ- अनिलदादा जगताप
  • गर्जा महाराष्ट्र मोरया जिल्हास्तरीय स्पर्धा ही कुठल्याही राजकीय हेतूने आयोजित केली नसून ही स्पर्धा केवळ बीडचे सांस्कृतिक वैभव अबाधित राहावे यासाठी शिवसेनेच्या वतीने उभारण्यात आली आहे असे स्पर्धेचे आयोजक बीड शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले व गर्जा महाराष्ट्र मोरया या जिल्हास्तरीय स्पर्धेची सखोल माहिती दिली. याबरोबरच सर्व शाळा मुख्याध्यपक, शिक्षक, पालक आणि बालकलारांचे स्वागत करत आभार व्यक्त केले.

 

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!