11.6 C
New York
Sunday, May 25, 2025

Buy now

spot_img
spot_img

केदारेश्वर मंदिर येथे ह.भ.प.रामराव ढोक महाराजांच्या किर्तनाचे आयोजन ; किर्तनाचा लाभ घ्यावा – प्रदीप खाडे 

केदारेश्वर मंदिर येथे ह.भ.प.रामराव ढोक महाराजांच्या किर्तनाचे आयोजन ; किर्तनाचा लाभ घ्यावा – प्रदीप खाडे 

नाथ शिक्षण संस्थाकडून श्री केदारेश्वर मंदिरात आकर्षक रोषणाई व फुलांची सजावट..

अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- 

अंबाजोगाई शहरातील जागृत देवस्थान श्री केदारेश्वर मंदिर व परिसरात कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ शिक्षण संस्थेच्या वतिने आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली आहे.सोमवार दि.११ सप्टेंबर २०२३ रोजी सायं.६ वाजता ह.भ.प.रामराव ढोक महाराजाचे किर्तनाचे आयोजन करण्यात आले असुन या किर्तनास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदीप खाडे यांनी केले आहे.

श्री केदारेश्वर मंदिरात दर्शन घेण्यासाठी श्रावणमासासात मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती. कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ शिक्षण संस्थेच्या कडून श्री केदारेश्वर मंदिरात मनमोहक विद्युत रोषणाई, पुष्पसजावट करण्यात आली आहे. विविध फुलांच्या सजावटीने बहरले असून अत्यंत आकर्षक विद्युत रोषणाई सजावट व विविध आकर्षक फुलांची आरास मंदिर परिसर,गाभारा व सर्व ठिकाणी करण्यात आली आहे.हर हर महादेवचा जयघोष करत श्री केदारेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसरात भक्तीमय वातावरण झाले आहे. तसेच सोमवार दि.११ सप्टेंबर रोजी रामायणाचार्य ह.भ.प.रामराव ढोक महाराजाचे किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. भविक भक्तांनी कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदीप खाडे यांनी दिली आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!