शेकडो ठेवीदारांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन..!

0
146
  • शेकडो ठेवीदारांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन..!
  • बीड प्रतिनिधी -जिल्ह्यातील  शेकडो गोरगरीब र्पॉलिसीधारकांनी आपली अनेक नॉन बँकिंग कंपन्यांमध्ये केंद्राच्या सीबीने केलेल्या कारवाईमुळे कोट्यांवधी रुपये अडकून पडल्यामुळे पैसा आम्हच्या कष्टाचा, नाही कोनाच्या बापाचा, पहले भुगतान फिर मतदान अशा घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून ठिय्या मांडला या आंदोलनात असंख्य ठेविदारांमध्ये पुरूषासह महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसून आला होता.
  • बीड जिल्ह्यातील गोरगरीब जनता अत्यंत कष्टाळू असुन
    गेली पंधरा वर्षांपूर्वी नॉन बँकिंग कंपन्या पीएसीएल इंडिया लिमिटेड गरिमा, एचबीएन समृद्धी जीवन, मैत्रेय प्रायव्हेट लिमिटेड , पॅन कार्ड क्लब, सन शाईन, ट्विंकल, फिनो मिलन हेल्थ इन्शुरन्स, यासह असंख्य नॉन बँकिंग कंपन्यांनी गोरगरिबांचा भरमसाठ पैसा गोळा करून विविध आमिष दाखवून डल्ला मारला . जिल्ह्यात एक लाखाच्या वर ठेवीदारांची कोट्यांवधी रुपयाची ठेवी केंद्राच्या सेबीने केलेल्या कारवाईमुळे अडकून पडलेली असून त्यामुळे गोरगरीब पॉलिसी धारकांवर उपासमारीची वेळ आली आहे.गेली आठ नऊ वर्षापासून भरलेला कष्टाचा पैसा अद्यापही मिळेनासा झाल्यामुळे गोरगरीब पॉलिसीधारक मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे आपल्या कष्टाच्या हक्काचा पैसा गुंतवलेला कामी येत नसल्यामुळे संतप्त झालेल्या ठेवीदारांनी  मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून ठिय्या मांडला पैसा आम्हच्या कष्टाचा,नाही कोनाच्या बापाचा असे म्हणत अनेक घोषणांनी परिसर दणाणून गेला तद्नंतर जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांना भेटून निवेदन दिले त्यांनी या बाबतीत दि 16 मार्च गुरुवार रोजी दुपारनंतर बैठक लावण्याचे संबंधितांना आदेश दिले.
  • दिलेले निवेदन हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिले असून ते जिल्हाधिकारी यांच्या मार्फत आहे. संपूर्ण देशात हे आंदोलन झालेले आहे देशाचे या बाबतीतील प्रमुख म्हणून मदनलाल आझाद हि लढाई लढत आहेत.
  • आज झालेल्या आंदोलनात ठगित पिठी जमाकर्ता परिवाराचे जिल्हाअध्यक्ष भाऊसाहेब नांदे, मोहन वाघमारे रत्नमाला नाईक, आण्णासाहेब घिगे,गायञी दुबाले , राहुल सुर्डिकर, ब्रम्हनाथ चव्हाण,अरूण पवार , जगन्नाथ परजणे, सुनील जेधे यांच्यासह असंख्य ठेवीदार महिला,पुरूषांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here