श्री गुरु बंकटस्वामी महाराज यांच्या वर श्रद्धा ठेवा आयुष्यात काहीच कमी पडणार नाही – नाना महाराज कदम
बीड प्रतिनिधी – श्री गुरु बंकटस्वामी महाराज यांच्या कृपेने व वै. ह. भ. प. सुदामदेव महाराज व वै. ह. भ. प. शांतीब्रम्ह रामहारी महाराज बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने वै. सुदामदेव बाबा यांच्या शताब्दी निमित्त सुरु झालेला सावंतवाडी येथे अखंड हरीनाम सप्ताहाची दुसऱ्या दिवसाची किर्तन सेवा ह. भ. प नाना महाराज कदम यांची किर्तन सेवा संपन्न झाली.
- संतांचिया पायी हा माझा विश्वास । सर्वभावे दास झालो त्यांचा ।।
- तेचि माझे हित करिती सकळ । जेणे हा गोपाळ कृपा करी ।।
- भागलिया मज वाहतील कडिये । त्यांचियाने जोडे सर्वसुख ।।
- तुका म्हणे शेष घेईन आवडी । वचन न मोडी बोलिले ते ।।
तुकाराम महाराज म्हणतात मला संतांवर, त्यांच्यापायी एवढा दृढ विश्वास आहे की मी संपूर्णपणे आणि सर्वभावाने त्यांचा दास झालो आहे. तेच खऱ्या अर्थाने मला योग्य तो मार्ग दाखवून किंबहुना योग्य त्या मार्गावर आणून माझे सर्व हित करतील जेणेकरून श्री हरी माझ्यावर कृपा करेल. ते पुढे म्हणतात अशा ह्या खडतर मार्गावर चालताना, मार्गक्रमण करताना मी जर थकलो, भागलों तर तेच मला उचलून एखाद्या माउलीप्रमाणे कडेवर घेतील, मला काय हवे नको ते पाहतील व त्यांच्या ह्याच दयाळूपणामुळे मला सर्वसुखाची प्राप्ती होईल, माझ्या सर्व इच्छा आपोआप पूर्ण होतील.
तुकोबाराय म्हणतात अशा या संतमंडळींचे शेष म्हणजेच उच्छिष्ट देखील मी आवडीने सेवन करिन, त्यांच्या सर्व आज्ञा पाळींन आणि मी हे काही बोलत आहे, माझ्या मुखातून जे काही शद्ब बाहेर पडत आहेत ते एखाद्या वचनाप्रमाणे असून मी त्यातील एकही शद्ब मोडणार नाही.
उभ्या महाराष्ट्रात जो सकाळी काकडा गायला जातो तो फक्त बंकट स्वामी महाराज यांच्या मुळे गायाल जातो.
महाराजांनी त्यांच्या गोड वाणीतून भाविक भक्तांना गोड असा संदेश दिला. गोड अश्या अभंगातून भाविक भक्त किर्तन एकूण भारावून गेले. आणि गोड वाणीतून भाविक भक्तांना मंत्रमुग्ध केले.
गायनाचार्य – गोरख महाराज वायभट, रोहिदास महाराज शिंदे, मृदंगाचार्य – बंडू महाराज सातपुते, शंतनु महाराज धूर्वे, रणजित महाराज शिंदे, हरिदास महाराज खुळे , सिरसाठ महाराज, श्रीकृष्ण महाराज खोसे, त्रिंबक महाराज शेळके, वसंत महाराज शिंदे, साहेबराव महाराज लहाने, तुळशीराम अपा, योगेश महाराज जोगदंड तसेच बंकटस्वामी मठ संस्थान मधील विद्यार्थी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित सावंत कलेक्शन चे मालक सावंत आप्पा, NEWS 18 लोकमत जिल्हा प्रतिनिधी सुरेश महाराज जाधव, राम पायाळ, पत्रकार अभिजीत पवार, संजय सावंत पंचक्रोशीतील भाविक भक्त तसेच मोठया प्रमाणात ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.