12.8 C
New York
Monday, May 20, 2024

Buy now

जालिंदर धांडे यांची राज्य सरचिटणीस पदी नियुक्ती..!

जालिंदर धांडे यांची राज्य सरचिटणीस पदी नियुक्ती..!

♦️निवासी संपादक-दिपक वाघमारे 

बीड प्रतिनिधी – अल्पावधीत देशभरात मोठी संघटना बनलेली व्हाईस ऑफ मीडिया ही संघटना देशभरात जोरदार काम करत असून राज्यात सुद्धा पत्रकारांची मोठी संघटना उभी केली आहे. ही संघटना पत्रकारांसाठी सकारात्मक काम करत असून त्या दृष्टीने पावले टाकत आहे. व्हाईस ऑफ मीडिया या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र राज्य कुटुंब शिक्षण समितीच्या राज्य सरचिटणीस पदी जालिंदर ज्ञानदेव धांडे यांची नियुक्ती धाराशिव येथील कार्यक्रमात करण्यात आली.

व्हाईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी या निवडीची घोषणा करत जालिंदर धांडे यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांची एक वेगळी ओळख आहे. परंतु ग्रामीण भागातील पत्रकारांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो, अनेक पत्रकार आर्थिक सक्षम नसल्यामुळे कुटुंबाचा गाडा व्यवस्थित चालू शकत नाही. यासह इतर समस्यांचा सामना पत्रकारांना करावा लागतो. या सर्व बाबींचा आढावा घेऊन संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी व्हाईस ऑफ मीडिया या संघटनेची स्थापना केली. व्हॉइस ऑफ मीडियाच्या जिल्हाध्यक्षांना राज्यपालांच्या हस्ते शपथ देण्यात आले ही घटना देशातील एकमेव घटना आहे. व्हाईस ऑफ मीडिया या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र राज्य कुटुंब शिक्षण समितीच्या राज्य सरचिटणीस पदी जालिंदर ज्ञानदेव धांडे यांची धाराशिव येथील कार्यक्रमात नियुक्ती करण्यात आले. संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष संजय मालाणी, राज्य कार्यवाहक तथा बीड जिल्हाध्यक्ष बालाजी मालगुडे, कार्याध्यक्ष दिनेश लिंबेकर यांनी जालिंदर धांडे यांना पुढील कार्यास शुभेच्छा देत अभिनंदन केले.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!