22.1 C
New York
Sunday, May 19, 2024

Buy now

श्री क्षेत्र चाकरवाडी येथे माऊली दादांच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी..!

श्री क्षेत्र चाकरवाडी येथे माऊली दादांच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी..!

मुख्य संपादक – अभिजीत पवार 

चाकरवाडी प्रतिनिधी – महाराष्ट्रातील धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र चाकरवाडी मध्ये आज शनी अमावस्या असल्यामुळे लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. साधारणता तीन ते चार किलोमीटर अंतरावर वाहनांच्या लांबची लांब रांगा लागल्या होत्या. दर्शनासाठी भाविक भक्तांना चार किलोमीटर अंतर पायी चालत यावे लागत होते.

नेकनुर येथील पोलीस कर्मचाऱ्यांनी अतिशय तगडा बंदोबस्त राबवला गेला. वाहतूक सुरळीत करण्यात नेकनुर पोलीस स्टेशन येथील खांडेकर साहेब , सय्यद साहेब यांनी तसेच नेकनुर पोलिस स्टेशन कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती. भाविकांच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने चाकरवाडी नगरी दुमदुमली. भाविकांच्या गर्दीनं श्री क्षेत्र चाकरवाडी नगरी फुलुन गेली होती.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!