15.5 C
New York
Friday, May 17, 2024

Buy now

माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे – सोमनाथ मोटे

माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे – सोमनाथ मोटे

मुख्य संपादक – अभिजीत पवार 

बीड प्रतिनिधी – न्यूज चैनल वरती व्हिडिओ व्हायरल झाला आहे या व्हिडिओमध्ये बावनकुळे साहेब यांनी भाषण करण्यास पंकजाताईंना रोखले आहे असे दाखवण्यात आले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया वरती चुकीच्या पद्धतीने व्हायरल झाला असल्याचे भाजप कार्यकर्ते गणेश लांडे यांनी म्हटले आहे. हा व्हिडिओ व्हायरल करण्यामागे पत्रकार सोमनाथ मोटे हेच आहेत असा आरोप गणेश लांडे यांनी केला आहे. परंतु माऊली न्यूज ने सोमनाथ मोटे यांची संवाद साधला असता त्यांनी म्हटले आहे हा गुन्हा माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या चैनल वरती व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्या चैनल चा मी प्रतिनिधी सुद्धा नाही. ज्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे त्यांनी विचारपूस करून गुन्हा दाखल केला आहे का असे सुद्धा यावेळी सोमनाथ मोटे यांनी म्हटले आहे. जर पत्रकारावर गुन्हा दाखल होत असेल तर हा लोकशाही वर गुन्हा दाखल होत आहे असे सुद्धा यावेळी माऊली न्यूज बोलताना सोमनाथ मोटे म्हणाले आहेत.

 

पण कार्यक्रमांमध्ये पंकजाताई म्हणत होत्या मला दोन मिनिटे बोलू द्या, पण बावनकुळे साहेब म्हणाले नाही इथपर्यंत हे सत्य आहे सर्व समोर झाले येवढे दिसुन येते मात्र छेडछाडीच्या काम पत्रकार करत नसतो तो थेट विचारतं असतो. असे यावेळी सोमनाथ मोटे यांनी म्हटले आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!