12.4 C
New York
Sunday, May 25, 2025

Buy now

spot_img
spot_img

देशाच्या घटनाकाराला मानवंदना देऊन जलौषात साजरी झाली चौसाळा येथे डाँ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती.!


  • देशाच्या घटनाकाराला मानवंदना देऊन जलौषात साजरी झाली चौसाळा येथे डाँ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती.!
  • चौसाळा :- बीड तालुक्यातील चौसाळा हे गाव म्हणजे सर्व धर्म समभाव असणारे गाव म्हणुन ओळखले जाते ,चौसाळा गावात महामनावांच्या जयंत्या धार्मिक उत्सव मोठया जल्लोषात साजरा केले जातात.भारताचा कोहिनुर हिरा म्हणुन ज्या विश्ववंदनीय बाबासाहेबांना मानले जाते त्या विश्वरत्न बोधीसत्व डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठया उत्साहात चौसाळा शहरात साजरी करण्यात आली.चौसाळा शहरात अठरा पगड जात धर्माचे बांधव सामाजिक सलोखा राखत आनंदाने नांदतांना दिसतात. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, डाँ.बाबासाहेब आंबेडकर ,अन्नाभाऊ साठे आणी सर्व महापुरूषांच्या जयंत्या आणी धार्मिक उत्सव एकोप्याने साजरे करणारे गाव म्हणजे चौसाळा अशी ओळख चौसाळा या गावची झालेली आहे. महापुरुषांच्या जयंत्या मधुन समाजप्रबोधना बरोबरच विविध कला गुणांना वाव देणाऱ्या स्पर्धा सुध्दा आयोजित केल्या जातात.चौसाळा शहरात विविध जात ,धर्म, पंथाचे बांधव जरी रहात असले तरीही सार्वजनिक कार्यात आणी कार्यक्रमात सर्वजन हिरीरीने भाग घेतात हे विशेष. यंदा डाँ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची मिरवणूक राजर्षी शाहु नगर या ठिकाणाहुन भव्य दिव्य स्वरुपात काढण्यात आली.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शरद झोडगे ,भाजपा अनुसुचित जाती मोर्चा बीड तालुका अध्यक्ष पवन कुचेकर,अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष सलिम जहागिरदार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी जयंती उत्सव समितीचे आयोजक तथा चौसाळा पत्रकार संघाचे अध्यक्ष विवेक कुचेकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद चंद्रजी पवार गटाचे शिरूर लोकसभा मतदार संघाचे प्रमुख पांचग्रे साहेब, एकता ग्रुपचे अध्यक्ष स्वप्नील सोनवणे ,यांच्या सह महीला भगिणी या मिरवणुकीत मोठया संख्येने उपस्थीत होत्या. विश्वरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकरांच्या या मिरवणुकीत भिम अनुयायी आणी चौसाळा परिसरातील नागरिकांनी जयंतीत सामील होऊन आपल्या डोक्यावरती निळे आणी पांढरे शुभ्र फेटे बांधलेले होते एकदंरीत चौसाळा शहर निळं निळं झालेलं बघायला मिळाले.भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशास बहाल केलेल्या घटनेचे पालन करत बंधुभाव, एकता,सामाजिक सलोखा या सर्व हितकारक विचारांचे पालन करत चौसाळा शहरातील नागरिक आपल्या बाबांची जयंती उल्हासात साजरी करतांना दिसले.चौसाळा शहरातील छत्रपती शाहु महाराज यांच्या चौकास पुष्प हार अर्पण करून ही मिरवणुक वाजत गाजत आणी महापुरुषांच्या नावाच्या उद्घोषणा करत संपुर्ण चौसाळा शहरात साजरी झाली. तरुण, महीला ,वृद्ध  आणी लहान बालकांचा जल्लोष या मिरवणुकीत बघायला मिळाला. जात ,धर्म, पंथ यांना बाजुला सारुन सर्व जाती धर्माचे नागरिक या जयंती सोहळयात न्हाऊन निघाल्याचे चित्र चौसाळा येथे बघायला मिळाले.चौसाळा शहरात अनेक महापुरूषांच्या नावाने चौक आहेत या सगळया महापुरुषांच्या नावाच्या चौकांना पुष्पहार अर्पण करून डाँ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठया उत्साहात पार पडली. या जयंती सोहळयात साहील सोनवणे,गणेश सोनवणे,मच्छींद्र गायकवाड,वैभव सोनवणे,विजय बोबडे,समाधान पौळ,कृष्णा चव्हाण,प्रकाश ढोकणे, राज सोनवणे,शंकर सोनवणे,नितीन काळे,निवांत वाघमारे,साजिद पठाण,तोफेक पठाण,अनिल पवार,जितीन काळे,पत्रकार संघाचे मार्गदर्शक बळीराम राऊत,पत्रकार अजमेर मनियार,पत्रकार ख्वाजाभाई जहागिरदार आमोल जावळे, प्रदीप ईंगोले,विकी चव्हाण, रवि सोनवणे,मुस्तगिर जहागिरदार, आसेफ जहागिरदार,मुजमिल जहागिरदार,आसेफ कुरेशी सह चौसाळा शहरातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी ,पत्रकार मोठया संख्येने उपस्थीत होते.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!