9.7 C
New York
Sunday, May 5, 2024

Buy now

39 बीड लोकसभा मतदारसंघ निवडणूक चौथ्या दिवशी ६ उमेदवारी अर्ज दाखल तीन अपक्ष तीन पक्षाकडून अर्ज दाखल आजपर्यंत एकूण दहा उमेदवारी अर्ज..

  • 39 बीड लोकसभा मतदारसंघ निवडणूक चौथ्या दिवशी ६ उमेदवारी अर्ज दाखल तीन अपक्ष तीन पक्षाकडून अर्ज दाखल आजपर्यंत एकूण दहा उमेदवारी अर्ज..
  • बीड लोकसभा मतदारसंघामध्ये आज चौथ्या दिवशी सहा नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले.
  •  बीड प्रतिनिधी:-39 बीड लोकसभा मतदारसंघातून आज 3 अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यामध्ये शेख एजाज शेख उमर, भास्कर किसन शिंदे , तुकाराम विठोबा उगले तर तीन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून तीन अर्ज सादर करण्यात आले. दोन अर्ज बजरंग मनोहर सोनवणे यांचे आहेत तर एक सारिका बजरंग सोनवणे यांचा अर्ज आहे. या सर्व उमेदवारांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या समक्ष अर्ज सादर सादर केला.
  • सोमवारी 14 इच्छुक उमेदवारांना 26 नामनिर्देशन पत्राचे वाटप करण्यात आले. आजपर्यंत एकूण 94 इच्छुक उमेदवारांना 211 नामनिर्देशन पत्राचे वाटप झाले. 39 बीड लोकसभा मतदारसंघासाठी आतापर्यंत 10 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
  • 39 बीड लोकसभा मतदारसंघासाठी दि. 18 एप्रिल 2024 रोजी अधिसूचना जारी करण्यात आली असून 25 एप्रिल 2024 ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. तर 26 एप्रिल2024 रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. 29 एप्रिल 2024 ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.
  • सोमवार दि. 13 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. तर 4 जून रोजी मतमोजणी केली जाणार आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!