6.6 C
New York
Saturday, April 27, 2024

Buy now

मराठा आंदोलकांनी अडवली पंकजा मुंडेंची गाडी

मराठा आंदोलकांनी अडवली पंकजा मुंडेंची गाडी..

पोलिसांकडून जमावावर लाठीचार्ज..

बीड प्रतिनिधी – भाजप नेत्या आणि बीड लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा मराठा आंदोलकाच्या रोशाचा सामना करावा लागला आहे.केजमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोहोचलेल्या पंकजा मुंडे यांना घेराव घालत मराठा आंदोलकांनी त्यांची गाडी अडवली. दरम्यान पोलिसांनी तात्काळ आंदोलकांवर कारवाईकरत त्यांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज केल्याची माहिती मिळतेय. यानतंर पोलिस संरक्षणात पंकजा मुंडे यांची गाडी आंदोलकांच्या घेरातून बाहेर काढण्यात आली. यावेळी आंदोलकांनी मराठा आरक्षणाबाबत जोरदार घोषणाबाजी केली. जवळपास 20 मिनिटं हा सर्व गोंधळ सुरू होता अशी माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार भाजप नेत्या पंकजा मुंडे सध्या लोकसभेचा प्रचार करत आहेत. यादरम्यान केज तालुक्यातील पावनधाम येथे त्यांना मराठा आंदोलकाच्या रोशाचा सामना करावा लागला. पावनधाम येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. याठिकाणी भेट देण्यासाठी पंकजा मुंडे दाखल झाल्या होत्या. परंतु या ठिकाणी आधीपासून मराठा आंदोलकांनी मोठी गर्दी केली होती. पंकजा मुंडे येताच मराठा आंदोलकांनी आरक्षणाच्या प्रश्नावर जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलकांनी पंकजा मुंडे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळतेय. यावेळी आंदोलक अतिशय आक्रमक झाले होते. त्यामुळे पोलिसांना त्यांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला. यामुळे काही काळ या ठिकणी तणावाचे वातावरण होते.

 

काही आंदोलकांना आधीच ताब्यात घेतले

 

दरम्यान पंकजा मुंडे यांनी घाईघाईमध्ये सप्ताह सुरू असलेल्या ठिकाणी दर्शन घेतले आणि तेथून काढता पाय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार पंकजा मुंडे दर्शनासाठी येणार याची माहिती मराठा आंदोलकांना आधीपासून होती. त्यामुळे काही मराठा आंदोलकांना पोलिसांनी अगोदरच त्याब्यात घेतले होते. परंतु यामुळे चिडलेल्या मराठा आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!