11.7 C
New York
Friday, May 23, 2025

Buy now

spot_img
spot_img

डॉ. ज्योती मेटे यांचा अप्पर सहनिबंधक पदाचा राजीनामा

  • डॉ. ज्योती मेटे यांचा अप्पर सहनिबंधक पदाचा राजीनामा
  • बिड का खासदार कैसा हो, ज्योती मेटे जैसा हो कार्यकर्त्यांची घोषणाबाजी..

बीड प्रतिनिधी  – शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक स्वर्गीय विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योतीताई मेटे यांनी अप्पर सहकार विभागाच्या सहनिबंधक पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता ज्योती मेटे बीड मधून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ज्योती मेटे यांनी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती. त्यावेळेस शरद पवार गटाच्या वतीने निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

यामुळे ज्योती मेटे यांचा लोकसभा निवडणूक लढवण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून त्यांच्या बीड लोकसभा निवडणूक लढवण्याच्या शक्यतेवर शिक्कामोर्तब झाला आहे. यातच ते शरद पवार गटाकडून लोकसभा निवडणूक लढू शकतात अशी चर्चा आहे. मात्र या चर्चेला अद्याप पूर्णविराम मिळाले नाही. एक चर्चा अशी आहे की, त्या मनोज जरांगे पाटलांचा अपक्ष झेंडा हाती घेऊ शकतात. मात्र ही अद्यापही फक्त चर्चाच आहे.

दरम्यान, राजीनामा देण्याआधी माध्यमांशी संवाद साधताना लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत ज्योती मेटे म्हणाल्या की, गेल्या अनेक दिवसांची पोकळी भरून काढण्यासाठी आता मी ठरवलं आहे. त्यामुळे मी आता यापुढे पूर्णपणे राजकीय काम करणार आहे. यावेळी ज्योती मेटे शिवसंग्राम भवन येथे आल्या असता, तिथे उपस्थित कार्यकर्त्यांनी बिड का खासदार कैसा हो, ज्योती मेटे जैसा हो असं म्हणत घोषणाबाजी देखील केली.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!