12.7 C
New York
Saturday, April 27, 2024

Buy now

लिंबागणेश येथे शहीद दिनानिमित्त भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना अभिवादन:- डॉ.गणेश ढवळे 

  • लिंबागणेश येथे शहीद दिनानिमित्त भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना अभिवादन:- डॉ.गणेश ढवळे
  • 🔲 उपसंपादक-दिपक वाघमारे 
  • लिंबागणेश:- बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील ग्रामपंचायत कार्यालयात आज दि.२३ मार्च शनिवार रोजी शहिद दिनानिमित्त देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत आदरांजली वाहण्यात आली यावेळी सरपंच बालासाहेब जाधव,ग्रां.स.श्रीहरी निर्मळ,दामु थोरात, समीर शेख,अक्षय वाणी, रमेश गायकवाड, पत्रकार हरिओम क्षीरसागर, अँड.गणेश वाणी, विक्रांत वाणी भगवान मोरे, संतोष भोसले, गणपत तागड,भरत वाणी,ग्रां.कर्मचारी जिवन मुळे,कचरू निर्मळ आदि उपस्थित होते.
  • शहिद दिनाचे महत्त्व विशद करताना सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी २३ मार्च रोजी दरवर्षी शहिद दिवस म्हणून देशभरात साजरा केला जात असुन भारताला स्वातंत्र्य मिळवुन देण्यासाठी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या स्मरणार्थ देशभरात शहिद दिवस साजरा केला जातो.२३ मार्च१९३१ रोजी इंग्रजांनी सह भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या भारतमातेच्या वीर जवानांना फाशी दिली होती.त्यांच्या बलिदानामुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा मिळाली होती त्यामुळेच आजचा २३ मार्च दिवस शहीद दिन म्हणून साजरा करण्यात येतो.१९२८ मध्ये भारतातील घडामोडींचा अभ्यासासाठी इंग्लंडहून ‘सायमन कमिशन ‘ नावाचं शिष्टमंडळ आले होते भारतात सर्वत्र या शिष्टमंडळाचा काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला होता यावेळी लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला होता ‘सायमन परत जा ‘ च्या घोषणांनी सारा परिसर दुमदुमला होता.जमाव पांगवण्यासाठी पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठी हल्ल्यात लाला लजपतराय गंभीर जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.देशभक्तीने भारावलेल्या क्रांतीकारकांना हे सहन झाले नाही.लालाजींच्या मृत्युस कारणीभूत असणाऱ्या लाहोर पोलिस ठाण्यातील इंग्रज अधिकारी सँडर्स याचा लालाजीच्या पहिल्या मासिक श्राद्धाच्या दिवशीच भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव तिघांनी गोळ्या झाडून खून केला. याप्रकरणी २३ मार्च १९३१ रोजी लाहोरच्या तुरुंगात तिघांना फाशी देण्यात आली ‌शहिद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या स्मरणार्थ दरवर्षी २३ मार्च रोजी आदरांजली अर्पण करत शहिद दिवस भारतीय साजरा करतात.भगतसिंगाची हि लढाई केवळ राजकीय स्वातंत्र्य्या पुरतीच मर्यादित नव्हती तर सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्यासाठी होती.ब्रिटीशांच्या जोखडातून मुक्त करण्याबरोबरच समाजवादी रचनेवर आधारित समाज निर्माण करण्याचे भगतसिंगाचे स्वप्न होते.सर्व माणसांच्या अन्न वस्त्र निवारा, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या मुलभूत अत्यावश्यक गरजा भागविण्याची सोय म्हणजे समाजवाद असे नमुद करताना भगतसिंगानी क्रांती म्हणजे सध्या अस्तित्वात असणारी साम्राज्यवादी , भांडवली समाज व्यवस्था संपुर्ण उलथून टाकून तिच्या जागी समाजवादी व्यवस्था प्रस्थापित करणे हे अंतिम ध्येय होते असे नमुद केले.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!