6.9 C
New York
Saturday, April 27, 2024

Buy now

पाणीटंचाई आढावा निमित्ताने तलावांना भेटी देणा-या जिल्हाप्रशासनाचे तलावाच्या भिंतीवरील झाडाझुडुपांकडे दुर्लक्ष :- डॉ.गणेश ढवळे

  • पाणीटंचाई आढावा निमित्ताने तलावांना भेटी देणा-या जिल्हाप्रशासनाचे तलावाच्या भिंतीवरील झाडाझुडुपांकडे दुर्लक्ष :- डॉ.गणेश ढवळे
  • बीड:- बीड जिल्ह्यात यंदाच्या हंगामात परतीचा अवकाळी पाऊस सोडता एकाही नदी-ओढ्यातुन पाणी वाहिले नाही. त्यामुळे जलस्त्रोताची पाणीपातळी तशीच राहिली.पावसाने ओढ दिल्याने उन्हाळ्यात तिव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असुन पाणीटंचाई आढावा घेत आवश्यक उपाययोजना करण्याहेतुने जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी साठवण तलावांना प्रत्यक्ष भेट देऊन वस्तुस्थिती पाहत आहेत.मात्र याच पाणीटंचाईचा आढावा घेणा-या अधिका-यांना साठवण तलावाच्या पिचवर मोठ्या प्रमाणावर झाडेझुडपे असुन सुद्धा आणि दरवर्षी मान्सुनपुर्व दुरुस्तीचा कागदोपत्रीच खर्च दाखवत असताना याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहेत.यामुळे संबंधित प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.
  • पाली येथील बिंदुसरा धरणाच्या भिंतीवर मोठमोठाली झाडेझुडपे
  • बीड शहरापासून जवळ असलेल्या सोलापूर ते धुळे राष्ट्रीय महामार्गावरील पाली येथील बिंदुसरा धरणाच्या जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक ३ अंतर्गत साठवण तलावाच्या भिंतीवर मोठमोठाली झाडे, झुडपे असून त्यामुळे तलावाच्या भिंतीला धोका निर्माण होण्याची शक्यता असुन सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.संबधित प्रकरणात लेखी तक्रार करूनही पाटबंधारे विभागाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे.
  • बीड जिल्ह्यातील साठवण तलावाच्या भिंतीवरील झाडाझुडुपांकडे पाणीटंचाई संयुक्त पथकाचा कानाडोळा.
  • भविष्यात पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी पाणीसाठा सुरक्षित केला असुन अवैध पाणी उपसा करण्यात येऊ नये यासाठी महसूल, पाटबंधारे, महावितरण तसेच स्थानिक कर्मचारी यांना जिल्हाप्रशासनाने सुचना दिल्या असुन विद्युत पुरवठा खंडित करण्याचे तसेच विद्युत मोटारी जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.तहसिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त पथके पाणी साठ्याची पाहणी करत असताना साठवण तलावाच्या भिंतीवरील झाडाझुडुपांकडे मात्र कानाडोळा करत असल्याचे दिसून येत आहे.

 

 

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!