9.8 C
New York
Friday, May 23, 2025

Buy now

spot_img
spot_img

पोलीस दलात भरती झालेल्या साठेगाव ता. सिंदखेडराजा मधील तरुणाने आपला पहिला पगार दिला गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानला..

पोलीस दलात भरती झालेल्या साठेगाव ता. सिंदखेडराजा मधील तरुणाने आपला पहिला पगार दिला गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानला..

वैद्यनाथ साखर कारखाना वाचवण्यासाठी घेतला निर्णय

बीड प्रतिनिधी – पोलीस दलात भरती झालेल्या साठेगाव ता.सिंदखेडराजा जि. बुलढाणा मधील तरुणाने आपला पहिला पगार गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानला दिला असून वैद्यनाथ साखर कारखाना वाचवण्यासाठी त्याने हा निर्णय घेतल्याचे सांगितले. सध्या या कारखान्याला सगळीकडून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. जवळपास ७ कोटी रुपये मदत आली असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. तर अंगांचे कातडे जरी सोलून दिले तरी मुंडे साहेबांचे उपकार फिटणार नाही असे मदत दिलेल्या तरुणाने म्हटले आहे.

साठेगाव ता. सिंदखेड राजा मधील नव्याने मुंबई शहर पोलीस दलात रुजू झालेला युवराज नागरे या तरुणाने आपला पहिला पगार वैद्यनाथ साखर कारखाना वाचवण्यासाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान कडे धनादेशाद्वारे दिला , सावरगाव घाट येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यात तो धनादेश ॲड.सचिन आंधळे व समस्त ग्रामस्थ मंडळी साठेगाव ता. सिंदखेड राजा यांच्या हस्ते पंकजा ताई मुंडे यांच्याकडे सुपूर्द करणार असल्याचे सांगितले

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!