20.7 C
New York
Saturday, May 18, 2024

Buy now

अनिलदादा जगताप आयोजित गर्जा महाराष्ट्र मोरया नृत्य स्पर्धेस भरगच्च प्रतिसाद..!

अनिलदादा जगताप आयोजित गर्जा महाराष्ट्र मोरया नृत्य स्पर्धेस भरगच्च प्रतिसाद..!

आता दि. 26 आणि 27 सप्टेंबर या दोन दिवशी रंगणार स्पर्धा..

===================

बीड, प्रतिनिधी – कला प्रेमींच्या खास आग्रहास्तव बीड शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप यांनी गणेश उत्सवानिमित्त दि. 26 सप्टेंबर आणि 27 सप्टेंबर या दोन दिवशी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य दिव्य जिल्हास्तरीय गर्जा महाराष्ट्र मोरया फेस्टिवलचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी जिल्ह्याभरातील शेकडो शाळेतून हजारो विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला असून अनिलदादा जगताप आयोजित गर्जा महाराष्ट्र मोरया जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेला स्पर्धाकांचा भरगच्च प्रतिसाद मिळाला आहे. स्पर्धकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन दि. 26 सप्टेंबर रोजी घेण्यात येणाऱ्या स्पर्धेचा आणखी एक ज्यादा दिवस वाढवला असून दि. 26 आणि 27 सप्टेंबर रोजी अशा दोन दिवशी गर्जा महाराष्ट्र मोरया स्पर्धा स्पर्धा रंगणार आहे. यामध्ये समूह नृत्य आणि वैयक्तिक नृत्य अशा दोन स्पर्धा होणार असून या स्पर्धेत इयत्ता पहिली ते पाचवी आणि इयत्ता सहावी ते दहावी असे दोन वयोगट असणार आहेत. विजेत्या स्पर्धकांना शिल्ड, प्रमाणपत्र आणि 2 लाख रुपयांपर्यंतचे रोख रकमेचे आकर्षक पारितोषिक देण्यात येणार आहेत. गणेश उत्सवात बीडकरांसाठी गर्जा महाराष्ट्र मोरया फेस्टिवल एक मेजवानी ठरणार आहे. बीड शिवसेनेची गर्जा महाराष्ट्र ही जुनी सांस्कृतिक चळवळ पुन्हा नव्याने उभारण्यात आली आहे. यागोदर 2008 आणि 2009 या वर्षात गर्जा महाराष्ट्र फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षांपासून गणेश उत्सवानिमित्त बीडमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचा अभाव पडलेला आहे. याबरोबरच बीडमध्ये सांस्कृतिक चळवळ थंडवल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत बीडमधील कलाकारांनी अनिल दादा जगताप यांच्याशी संपर्क साधून सांस्कृतिक कार्यक्रम उभा करावेत असा प्रस्ताव ठेवला होता. कलाकारांच्या या प्रस्तावाची दखल घेत अनिल दादा यांनी स्वतः पुढाकार घेऊन शिवसेनेच्या वतीने गर्जा महाराष्ट्र मोरया नामक जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन केले आहे.

सर्व स्पर्धाकांचे बीड नगरीत मनःपूर्वक स्वागत-अनिलदादा जगताप

बीडचे सांस्कृतिक वैभव अबाधित राहावे यासाठी आम्ही गणेश उत्सावानिमित्त मंगळवार दि. २६ सप्टेंबर आणि बुधवारी 27 सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बीड येथे ‘गर्जा महाराष्ट्र मोरया’ नामक जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेचे भव्य आयोजन केले आहे. यामध्ये कलाकारांच्या कलागुणांना चालना मिळावी याकरिता शिल्ड प्रमाणपत्र आणि रोख रकमेचे आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला बीड जिल्ह्यातून भरगच्च प्रतिसाद मिळाल्यामुळे 26 आणि 27 सप्टेंबर या दोन दिवशी ही स्पर्धा घेण्यात येत आहे. जिल्ह्याभरातून येत असलेल्या सर्व स्पर्धेकांचे बीड शिवसेनेच्या वतीने मी मनःपूर्वक स्वागत करतो. स्पर्धक, शिक्षक तथा पालकांसाठी स्पर्धे दरम्यान जेवणाची उत्तम सोय केलेली असून प्रत्येकाने स्पर्धेसह जेवणाचा देखील लाभ घ्यावा.

•••••

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!