वंचित बहुजन आघाडी च्या वतीने अभिवादन करून लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांची जयंती येळंब घाट येथे मोठया उत्साहात साजरी.
- वंचित बहुजन आघाडी च्या वतीने अभिवादन करून लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांची जयंती येळंब घाट येथे मोठया उत्साहात साजरी.
- ♦️निवासी संपादक-दिपक वाघमारे
- बीड दि ३१: बीड तालुक्यातील येळंब घाट येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी अध्यक्ष:विशाल कांबळे,उपाध्यक्ष:प्रणव जाधव,सचिव:तुशार कांबळे, कोषाध्यक्ष :संकेत कांबळे उपस्थित होते.
- तसेच वंचित बहुजन आघाडीचे बुद्धभूषण वंजारे,गणेश वंजारे, सुरज वंजारे, संघेश वंजारे,संजय वंजारे, संतोष वंजारे, सुमित पवळे, अक्षय जाधव, शुभम वंजारे,ऋषिकेश शिनगारे, अनिकेत वंजारे, दिक्षांत वंजारे प्रमोद दुनघव गणेश दुनघव आदी उपस्थित होते. सर्वांनी जयंती निमित्ताने डॉ अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले.
- साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 01/8/1920 साली महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामध्ये वाटेगाव येथे झाला.
- डॉ अण्णाभाऊ साठे हे पोवाडे, प्रवास वर्णने लावण्या,पटकथा, कादंबऱ्या अशा वेगवेगळ्या साहित्य प्रकारातील लेखन करणारे ख्यातनाम मराठी साहित्यिक म्हणून त्यांची ओळख आहे. लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे हे केवळ दीड दिवस शिक्षणासाठी शाळेत गेले कारण शाळेत होणाऱ्या भेदभावामुळे त्यांनी शाळेतील शिक्षण सोडून दिले.
- 1942 च्या चळवळीत सहभागी झाल्यामुळे ब्रिटिश पोलिसांना चकवत ते मुंबईला गेले आणि त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत स्वतःला झोकून दिले. 1950 साली महाराष्ट्राच्या चळवळीसाठी त्यांनी महाराष्ट्राची परंपरा या नावाने त्यांनी पोवाडे लिहिले आणि या साहित्याच्या माध्यमातून समाज सुधारनेचे कार्य केले.
- साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ अण्णाभाऊंनी आपले आयुष्य चिराग नगर झोपडपट्टीत काढले. देशभक्त, घोटाळे, बेकायदेशीर,अकलेची गोष्ट, अशी अनेक लोकनाट्य असे साहित्य लिहून त्यांनी समाज प्रबोधन केले.
- “माझी मैना गावाकडं राहिली माझ्या जीवाची होतीय काहीली” ही त्यांची गाजलेली छक्कड प्रसिद्ध आहे. अण्णाभाऊंनी 29 कथासंग्रह आणि 30 पेक्षा अधिक कादंबऱ्या लिहिल्या. एक मराठी लेखक, साहित्यिक,समाज सुधारक. साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांची जयंती येळंब घाट या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
error: Content is protected !!