15.2 C
New York
Monday, May 20, 2024

Buy now

गोरक्षनाथ टेकडीचा यावर्षीचा सप्ताह मोठ्या सभामंडपात व्हावा ही साहेबांची इच्छा होती इच्छा व्यक्त केली साहेबांनी आणि ती पूर्ण केली भक्तानी – डॉ. ज्योती विनायकराव मेटे

गोरक्षनाथ टेकडीचा यावर्षीचा सप्ताह मोठ्या सभामंडपात व्हावा ही साहेबांची इच्छा होती इच्छा व्यक्त केली साहेबांनी आणि ती पूर्ण केली भक्तानी – डॉ. ज्योती विनायकराव मेटे

बीड प्रतिनिधी – बीड तालुक्यातील श्री. क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे विसाव्या शतकातील महान संत ह.भ.प.वै. सद्गुरू किसन बाबा महाराज यांच्या २५ व्या पुण्यतिथीनिमित्त रौप्य महोत्सवी-अखंड हरीनाम साप्ताहाची सांगता ह.भ.प. संजयजी महाराज पाचपोर यांच्या काल्याच्या कीर्तनाने संपन्न झाली. हा साप्ताहा मठाधिपती ह.भ.प. शांतिब्रम्ह गुरुवर्य श्री नवनाथ बाबा महाराज यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी जिल्हातील अनेक राजकीय,सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि गोरक्षनाथ टेकडीचे भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी डॉ. ज्योती विनायकराव मेटे या उपस्थितांना बोलताना म्हणल्या की गोरक्षनाथ टेकडीचा यावर्षीचा सप्ताह मोठ्या सभामंडपत व्हावा ही साहेबांची इच्छा होती. त्यांच्या दुःखद निधना नंतर त्यांनी भव्य सभा मंडप संदर्भात व्यक्त केलेली इच्छा गोरक्षनाथ टेकडीवर भक्ती असलेल्या सर्व मंडळींनी पूर्ण केली आहे. इच्छा व्यक्त केली एकाने आणि ती पुरी केली सर्वांनी असं यावेळी त्यांनी प्रतिपादन केले तसेच लोकनेते विनायकराव मेटे साहेब यांनी त्यांच्या हयातीत जे जे शब्द दिले आहेत ते पूर्ण करण्यासाठी शिवसंग्राम आणि त्यांची पत्नी म्हणून मी सदैव तत्पर राहील टेकडीच्या विकासासाठी जे जे काही करता येईल ते सर्व आपण करू अशीही ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!